पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

भारत केवळ देशांतर्गत आघाडीवरच नाही तर हवामान बदलाशी लढण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय आघाड्या स्थापन करून आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदर्श ठेवत असल्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन

Posted On: 10 APR 2023 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2023

 

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, भारत केवळ देशांतर्गत आघाडीवर नाही तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA), आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधेसाठी (सीडीआरआय) सहयोग, उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गट (LeadIT) अशा विविध आंतरराष्ट्रीय आघाड्यांद्वारे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श प्रस्थापित करत आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे राष्ट्रीय हवामान परिषद 2023 च्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना, यादव यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये हरित वाढीवर लक्ष केंद्रित करून हवामान क्षेत्रात भारताने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची रूपरेषा मांडली. त्यांनी हरित हवामान निधी (जीसीएफ) चमूची या परिषदेतील उपस्थितीबद्दल दखल घेतली आणि सर्व सहभागींना जीसीएफ कार्यपद्धतींची सखोल माहिती मिळविण्याची आणि ठोस हवामान प्रकल्प विकसित करण्याची विनंती केली. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सकारात्मक आणि सक्रियपणे तरुणांना सहभागी करून घेण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.

ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉप -26 मध्ये घोषित केलेल्या वर्धित हवामान कृतीच्या धर्तीवर हवामान कृतीला गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. "LiFE - पर्यावरणासाठी अनुकूल जीवनशैली" या विषयावर अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील या परिषदेची रचना करण्यात आली आहे.

हवामान क्षेत्रातील आव्हाने/समस्‍यांवर लक्ष केंद्रित करण्‍यासाठी भारतातील राज्‍य/केंद्रशासित प्रदेशातील अधिकार्‍यांना एका छताखाली आणणे आणि प्रशासनातील जोखीम, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवामान वित्त यासारख्या वैविध्यपूर्ण संकल्पनात परस्परांशी समन्वय साधणाऱ्या  हितधारकांचे एक मजबूत नेटवर्क तयार करण्‍यासह स्‍थानिक स्‍तरावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्‍याचा यामागे उद्देश होता.

 

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1915443) Visitor Counter : 141


Read this release in: English , Urdu , Hindi