श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओ गोवा कार्यालयाकडून 10 एप्रिल रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन
Posted On:
06 APR 2023 5:00PM by PIB Mumbai
गोवा, 6 एप्रिल 2023
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) संघटनेकडून 10 एप्रिल रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ईपीएफओ दर महिन्याच्या 10 तारखेला आणि 10 तारखेला सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पेन्शन अदालतीचे आयोजन करते. ज्या सदस्य/निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनसंबंधी तक्रारी असतील त्यांनी 9 एप्रिलपर्यंत ईपीएफओ पोर्टलवर (https://epfigms.gov.in/Grievance/GrievanceMaster) नोंदवाव्यात. 10 एप्रिल रोजी पाटो, पणजी येथील ईपीएफओ कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ईपीएफओ गोवा कार्यालयाने सदस्यांच्या/ पेन्शनधारकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि पेन्शन वितरण प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. ईपीएफओ तक्रारींचे त्वरित आणि कार्यक्षम निवारण प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि सदस्यांना/पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शनचे वितरण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करते.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1914314)
Visitor Counter : 140