सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक गणना

Posted On: 05 APR 2023 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2023

 

देशाच्या भौगोलिक सीमे मधील सर्व बिगरशेती आर्थिक आस्थापनांची गणना म्हणजे, आर्थिक गणना. सहाव्या आर्थिक गणनेच्या निकालानुसार, देशात एकूण 5,84,95,359 आर्थिक आस्थापना सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत.

आर्थिक गणनेचा डेटा अनेक सरकारी आणि बिगर-सरकारी संस्थांना त्यांचे संशोधन, विश्लेषण, धोरण निर्मिती इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आला आहे. वापरकर्त्या संस्थांनी या आर्थिक गणनेच्या आकडेवारीचा(डेटा) उपयोग केल्यामुळे देशात आर्थिक विकास, रोजगार निर्मिती इत्यादीच्या विकासाची धोरणे बनवण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (आय/सी), नियोजन मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913940)
Read this release in: English , Urdu