श्रम आणि रोजगार मंत्रालय

असंघटीत कामगारांना त्वरित नोंदणी तसेच अद्यायावतीकरण सुविधा पुरविण्यासाठी ई-श्रम पोर्टलमध्ये उमंग मोबाईल अप्लिकेशनचे एकत्रीकरण

Posted On: 03 APR 2023 11:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने दिनांक 26.08.2021 रोजी वय वर्षे 16 ते 59 या गटातील असंघटीत कामगारांच्या ई-श्रम या आधार क्रमांकाशी जोडलेल्या राष्ट्रीय माहिती कोषाची सुरुवात केली. दिनांक 26 मार्च 2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार या पोर्टलवर 28 कोटी 78 लाख असंघटीत कामगारांनी नोंदणी केली आहे. ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीचे राज्यनिहाय तपशील परिशिष्टात दिले आहेत.आर्थिक वर्ष 2019-20 ते 2024-25 या कालावधीत या माहितीकोषाच्या परिचालनासाठी 704.01 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 24 मार्च 2023 पर्यंत त्यापैकी सुमारे 418 कोटी रुपयांचा वापर करण्यात आला आहे.
तरतूद केलेल्या निधीचा वापर पुढील काळात अधिक चांगल्या पद्धतीने करता यावा यासाठी मंत्रालयाने अनेक पावले उचलली असून, ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी देशभरातील असंघटीत कामगारांना नोंदणीचे बहु-पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत आहे. गावपातळीवर नोंदणी सुविधा पुरविण्यासाठी सामान्य सेवा केंद्रे-विशेष उद्देश्य सुविधा यांच्याशी जोडलेल्या 4 लाखांहून अधिक ग्रामीण पातळीवरील उद्योजकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.

  1. ज्या राज्यांमध्ये सामान्य सेवा केंद्रे मोठ्या प्रमाणात कार्यरत नाहीत तेथे राज्य सेवा केंद्रांना असंघटीत कामगारांच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीची सुविधा पुरविण्याचे काम देण्यात आले आहे.
  2. असंघटीत कामगारांना त्वरित नोंदणी तसेच अद्यायावतीकरण सुविधा पुरविण्यासाठी ई-श्रम पोर्टलमध्ये उमंग मोबाईल अप्लिकेशनचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
  3. नोंदणीकरणाचे काम अधिक वेगाने व्हावे यासाठी सामान्य सेवा केंद्रांशी समन्वयातून नियमितपणे आढावा बैठका घेण्यात येत आहेत.
  4. राज्य सरकारांना ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेला प्रोत्साहन देणारे उपक्रम सुरु करता यावेत या उद्देशाने मदत म्हणून राज्यांना आयईसी (माहिती, शिक्षण आणि संवाद) निधीचे देखील वितरण करण्यात आले आहे.
  5. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम पोर्टल वर अधिकाधिक प्रमाणात  नोंदणी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मंत्रालयातर्फे वेळोवेळी नोंदणी शिबिरे तसेच मोहिमा आयोजित करण्यात येत आहेत.

परिशिष्ट
दिनांक 27.03.2023 रोजी प्राप्त माहितीनुसार ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीची राज्यनिहाय लक्ष्ये आणि नोंदणीची वास्तविक आकडेवारी

Sl.No State Target Total Registered Target Achieved
1 UTTAR PRADESH 6,66,07,163 8,30,30,579 124.66%
2 ODISHA 1,29,79,773 1,33,32,320 102.72%
3 CHHATTISGARH 82,42,144 82,75,355 100.40%
4 UTTARAKHAND 31,50,240 29,73,710 94.40%
5 WEST BENGAL 2,78,90,604 2,58,14,852 92.56%
6 HIMACHAL PRADESH 20,86,547 19,24,751 92.25%
7 JAMMU AND KASHMIR 38,09,769 33,86,012 88.88%
8 JHARKHAND 1,08,06,305 91,71,721 84.87%
9 BIHAR 3,49,43,979 2,85,83,549 81.80%
10 TRIPURA 11,67,542 8,45,251 72.40%
11 MADHYA PRADESH 2,39,00,510 1,69,78,413 71.04%
12 ASSAM 99,69,971 69,43,291 69.64%
13 HARYANA 78,97,313 52,61,129 66.62%
14 PUNJAB 84,39,584 54,99,080 65.16%
15 DELHI 52,39,058 32,54,830 62.13%
16 GUJARAT 1,78,84,271 1,06,18,844 59.38%
17 KERALA 99,95,844 59,05,575 59.08%
18 RAJASTHAN 2,26,89,152 1,28,36,139 56.57%
19 CHANDIGARH 3,24,372 1,74,259 53.72%
20 ANDHRA PRADESH 1,50,92,950 79,54,498 52.70%
21 MANIPUR 8,65,632 4,05,798 46.88%
22 PUDUCHERRY 3,95,791 1,76,574 44.61%
23 THE DADRA AND NAGAR HAVELI AND DAMAN AND DIU 1,72,402 73,017 42.35%
24 KARNATAKA 1,89,17,552 75,29,782 39.80%
25 MAHARASHTRA 3,44,80,382 1,35,39,819 39.27%
26 TAMIL NADU 2,17,95,554 84,02,599 38.55%
27 TELANGANA 1,07,83,075 41,45,727 38.45%
28 LADAKH 80,926 29,524 36.48%
29 NAGALAND 6,29,914 2,18,887 34.75%
30 ARUNACHAL PRADESH 4,39,728 1,41,241 32.12%
31 MEGHALAYA 9,42,678 2,91,775 30.95%
32 ANDAMAN AND NICOBAR ISLANDS 1,16,770 28,564 24.46%
33 MIZORAM 3,46,988 58,376 16.82%
34 GOA 4,44,150 59,552 13.41%
35 SIKKIM 1,93,270 25,558 13.22%
36 LAKSHADWEEP 20,491 2,450 11.96%
  TOTAL 38,37,42,394 28,78,93,401 75.02%

 
केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लिखित उत्तराद्वारे लोकसभेत ही माहिती दिली.  

***

UmeshU/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1913548) Visitor Counter : 117


Read this release in: English , Urdu