श्रम आणि रोजगार मंत्रालय

समान कामासाठी वेतनामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव करण्यास वेतन संहिता 2019 प्रतिबंधित करते

Posted On: 03 APR 2023 11:16PM by PIB Mumbai

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे (MoSPI) 2017-18 पासून नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणाच्या (PLFS) माध्यमातून रोजगार आणि बेरोजगारीवरील आकडेवारी संकलित केली जाते.

सर्वेक्षणाचा कालावधी पुढील वर्षी जुलै ते जून असा आहे.  सध्या उपलब्ध ताज्या वार्षिक PLFS अहवालांनुसार, 2019-20, 2020-21 आणि 2021-22  या कालावधीत देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांसाठी नेहमीच्या स्थितीवर अंदाजे श्रमशक्ती सहभाग दर (LFPR) अनुक्रमे 30.0%, 32.5% आणि 32.8% होता, जो वाढता कल दर्शवतो.

महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग आणि त्यांच्या रोजगाराची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत.  महिला कामगारांना समान संधी आणि कामाच्या अनुकूल वातावरणासाठी कामगार कायद्यांमध्ये अनेक संरक्षणात्मक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.  सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 मध्ये भरपगारी प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवड्यांपर्यंत वाढवणे, 50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये अनिवार्य बालसंगोपन केन्द्राच्या सुविधेची तरतूद, पुरेशा सुरक्षा उपायांसह रात्रपाळीत महिला कामगारांना परवानगी देणे इत्यादी तरतुदी आहेत.  

कामगार आणि रोजगार राज्यमंत्री  रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

UmeshU/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1913504) Visitor Counter : 155


Read this release in: English , Urdu