भूविज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) 5 एप्रिल रोजी 23 वा स्थापना दिन साजरा करणार
Posted On:
03 APR 2023 6:15PM by PIB Mumbai
गोवा, 3 एप्रिल 2023
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) 5 एप्रिल 2023 रोजी आपला 23 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. हा कार्यक्रम गोवा येथील वास्को मधील हेडलँड सडा येथील एनसीपीओआर संकुलात होईल आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राचे संचालक डॉ. प्रकाश चौहान स्थापना दिन व्याख्यान देतील. गोव्यातील विविध संस्थांचे प्रमुख, प्राध्यापक, प्राचार्य आणि वरिष्ठ प्राध्यापक सदस्यांसह 250 हून अधिक मान्यवर पाहुणेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भारतीय समाजाच्या भविष्यासाठी ध्रुवीय प्रदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण आपल्या हवामान प्रणालींवर ते महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात आणि त्यांना आर्थिक आणि भू-राजकीय महत्त्व आहे. ध्रुवीय प्रदेशात भारताची दृश्यमान आणि प्रभावशाली उपस्थिती प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, एनसीपीओआरने ध्रुवीय प्रदेश आणि आसपासच्या महासागरांच्या अभ्यासात सहभागी राष्ट्रांच्या जागतिक चौकटीत आपल्या धोरणात्मक हितसंबंधांचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भारत जागतिक वैज्ञानिक प्रयत्नांमध्ये आघाडीवर राहील, आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करेल आणि आपल्या वसुंधरेला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात योगदान देईल हे एनसीपीओआरची ध्रुवीय आणि महासागर संशोधनाप्रति अतूट वचनबद्धता सुनिश्चित करते . संस्थेच्या संपर्क आणि सहकार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून वैज्ञानिकांना समाजाशी जोडण्याच्या कामाप्रति संस्थेचे समर्पण त्यांच्या संशोधनाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करते .
एनसीपीओआर विषयी
2000 मध्ये स्थापित राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था असून ध्रुवीय प्रदेशातील राष्ट्रीय मोहिमा आणि धोरणात्मक हितसंबंधांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आली. गेल्या दोन दशकांमध्ये,एनसीपीओआरने प्रमुख भारतीय ध्रुवीय संस्था म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली आहे आणि स्थापना दिनाचा सोहळा ही त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीची आणि राष्ट्रासाठी त्यांच्या प्रासंगिकतेची दखल घेण्याची एक योग्य संधी आहे.
एनसीपीओआरने ध्रुवीय प्रदेशात संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात लक्षणीय प्रगती केली आहे. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि भारताच्या "नील अर्थव्यवस्थेचा" मशाल वाहक असलेल्या डीप ओशन मिशन प्रकल्पाचे नेतृत्व ही संस्था करते. एनसीपीओआर अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारती ही दोन रिमोट स्टेशन तर आर्क्टिकमध्ये हिमाद्री आणि हिमालयात हिमांश रिमोट स्टेशन चालवते. हे सागर कन्या नावाच्या तरंगत्या समुद्रशास्त्रीय प्लॅटफॉर्मचे देखील ती व्यवस्थापन करते. याशिवाय, राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक भूवैज्ञानिक कार्यक्रमांचे नेतृत्व देखील ही संस्था करते.
* * *
PIB Panaji | N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1913391)
Visitor Counter : 168