परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
भारताच्या G20 अध्यक्षतेखालील दुसरी शेर्पा बैठक संपन्न
Posted On:
30 MAR 2023 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2023
भारताचे G20 अध्यक्ष सचिवालय, भारतातील संयुक्त राष्ट्र आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) यांनी संयुक्तपणे , गुरुवार, 30 मार्च रोजी, G20 शेर्पा बैठकीच्या पार्श्वभूमीवर, ‘हरित विकास: 21 व्या शतकासाठी महत्वाकांक्षी दृष्टीकोनाची गरज’, या संकल्पनेवर एक कार्यक्रम आयोजित केला होता.
केरळमध्ये कुमारकोम इथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत आणि इतर मान्यवरांची बीजभाषणे झाली. “भारताला आपले शाश्वत विकासाचे उद्दिष्ट (SDG) गाठण्यासाठी महत्वाकांक्षी, सर्वसमावेशक, निर्णयक्षम आणि कृती-केंद्रित व्हायचे आहे”, याचा अमिताभ कांत यांनी पुनरुच्चार केला, आणि हरित विकासासाठी नवीन दृष्टीकोनाची गरज, या विषयावरील चर्चेला सुरुवात केली.
दिवसभरातील ठळक घडामोडी पुढील प्रमाणे:
प्रभावी हरित परिवर्तन सुनिश्चित करण्यासाठी G20 मधील पुढील प्राधान्यक्रम ठरवण्यात आले-
- मानवी आणि नैसर्गिक भांडवलामधील दीर्घकालीन गुंतवणुकीचे व्यावसायिक मूल्य ओळखून आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय उद्दिष्टांमध्ये सुसंगती निर्माण करणे.
- सर्वात असुरक्षित समुदायांना ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी G20 च्या प्रयत्नांमध्ये सातात्त्य राखणे, कृषी सुधारणा पुढे नेणे आणि शाश्वत शहरे आणि जीवन शैलीची उभारणी करणे, त्याच बरोबर हरित विकासाकरता, न्याय्य परिवर्तनाला प्रोत्साहन देणे
- एकाच वेळी लवचिकता आणि समानता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने समायोजनासाठी एकत्रित प्रयत्नांवर जोर देत सुधारणायोग्य कृतीशील संधी ओळखणे
- विविध हितसंबंधितांमधील वाढीव सहकार्याद्वारे विकसनशील जगाच्या दिशेने हवामान आणि विकास वित्त पुरवठ्याची गती वाढवणे.
- शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व प्रकारच्या भांडवलामधील गुंतवणुकीत भरीव प्रमाणात वाढ करणे, बहुस्तरीय विकास बँकांना हेतू योग्य बनवणे, खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देणे आणि असुरक्षित देशांसाठी कर्ज आणि सवलतीच्या वित्तपुरवठ्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता
- जागतिक धोरण आणि आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा यांचे एकत्रीकरण सुनिश्चित करत, शाश्वत आणि हरित परिवर्तनासाठी एक पोषक राजकीय आणि आर्थिक वातावरण तयार करण्यासाठी अतिरिक्त दीर्घकालीन गुंतवणुकीतून आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या शक्यता अधोरेखित करणे आवश्यक आहे.
जी 20 शेर्पा बैठकीचे पूर्ण सत्र उद्यापासून सुरू होईल. माननीय परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे उद्घाटन सत्रात विशेष भाषण करतील.
Watch the full proceedings here.
Follow G20 India’s YouTube channel here.
* * *
JPS/R.Agashe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912377)
Visitor Counter : 221