जलशक्ती मंत्रालय
जल जीवन अभियानाची प्रगती
Posted On:
27 MAR 2023 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2023
ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात 2024 पर्यंत नळाद्वारे पाणी पुरवण्यासाठी केंद्र सरकार,राज्य सरकारांच्या सहकार्याने जल जीवन अभियान-हर घर जल 2019 च्या ऑगस्ट पासून राबवत आहे.
या कामासाठी निर्धारित निधीपैकी राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी जलजीवन योजनेअंतर्गत वापरासाठी घेतलेला आणि वापर केलेला निधी यांचा वर्षनिहाय तपशील खाली दिलेला आहे.
(Amount in Rs. Crore)
|
Central
|
Expenditure under State share
|
Centre + State Expenditure
|
Year
|
Fund allocated
|
Fund drawn by States
|
Reported utilization
|
2019-20
|
10,000.66
|
9,951.81
|
5,998.89
|
4,066.88
|
10,065.77
|
2020-21
|
11,000.00
|
10,917.86
|
12,542.03
|
7,803.36
|
20,345.39
|
2021-22
|
45,011.00
|
40,009.77
|
25,524.36
|
18,679.87
|
44,204.23
|
2022-23*
|
55,000.00
|
41,919.43
|
41,796.43
|
31,866.77
|
73,663.08
|
* As on 22.03.2023 Source: JJM-IMIS
संपूर्ण देशभरात जलजीवन मोहिमेचे लक्ष्य वेगाने गाठता यावे म्हणून अनेक पावले उचलली गेली. यामध्ये संयुक्त चर्चा, राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या वार्षिक कृती योजना पूर्णत्वाला नेणे, योजना कार्यान्वित करणे , ज्ञानाचे सामायिकीकरण त्याचप्रमाणे क्षमता वृद्धीसाठी त्याबद्दलच्या कार्यशाळा, परिषदा, वेबिनार आयोजित करणे, तंत्रज्ञान विषयक सहाय्यासाठी बहुशाखीय गटांच्या क्षेत्रभेटी आदींचा समावेश आहे.
ऑनलाइन मॉनिटरिंगसाठी जल जीवन योजना डॅशबोर्ड करण्यात आले. सार्वजनिक अर्थसंबंधी व्यवस्थापन पद्धतीद्वारे (फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टीम /PFMS) ) द्वारे पारदर्शक ऑनलाइन आर्थिक व्यवस्थापनाची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1911297)
Visitor Counter : 203