श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यवसाय सुरक्षा, आरोग्य आणि कार्य स्थिती संहिता, 2020 द्वारे स्थलांतरित कामगारांसह संघटित आणि असंघटित कामगारांच्या सर्व श्रेणींना सामाजिक सुरक्षा प्रदान

Posted On: 27 MAR 2023 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2023

स्थलांतरित कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) कायदा, 1979. लागू केला होता.हा कायदा आता व्यवसाय  सुरक्षा, आरोग्य आणि कार्य स्थिती (ओएसएच) संहिता , 2020 मध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. याद्वारे स्थलांतरित कामगारांसह सर्व श्रेणीतील संघटित आणि असंघटित कामगारांना योग्य कार्यस्थिती , किमान वेतन, तक्रार निवारण यंत्रणा, विनामूल्य मदत क्रमांक , गैरवर्तन आणि शोषणापासून संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा  प्रदान केली जाते.

एका राज्यातून दुसर्‍या राज्यात कामगारांचे स्थलांतर ही एक निरंतर आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे .  2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण 4.14 कोटी लोकांनी काम आणि रोजगारासाठी स्थलांतर केले आहे.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार बिहारमधून एकूण 7,06,557 लोक  इतर राज्यांमध्ये रोजगाराच्या उद्देशाने स्थलांतरित झाले.याशिवाय, या मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस असलेले ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे.स्थलांतराचा मागोवा घेण्यासाठी ई-श्रम पोर्टल असंघटित कामगारांचा सध्याचा आणि कायमस्वरूपी पत्ता याची नोंद ठेवते.

कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1911168) अभ्यागत कक्ष : 380
Read this releasein: English , Urdu