मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
भारत सरकारने मच्छिमारांना दिली बायोमेट्रिक ओळखपत्रं आणि क्यूआर कोडेड पीव्हीसी आधार कार्ड, भारत सरकारच्या विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य आणि तांत्रिक पाठबळ मिळवण्यासाठी त्याचबरोबर समुद्रावर सागरी सुरक्षा संस्थाना ओळख पटवण्यासाठी होणार उपयोग
आतापर्यंत 19,16,781 मच्छिमारांना देण्यात आली बायोमेट्रिक ओळखपत्रं आणि 12,40,869 मच्छिमारांना देण्यात आली क्यूआर कोडेड पीव्हीसी आधार कार्ड
Posted On:
24 MAR 2023 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2023
मच्छिमारांना भारत सरकारच्या विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य आणि तांत्रिक पाठबळ मिळावे त्याचबरोबर समुद्रात असताना सागरी सुरक्षा दलांना त्यांची ओळख पटवता यावी याकरिता भारत सरकारच्या केंद्रीय क्षेत्र योजनेंतर्गत किनारपट्टीवरील मच्छिमारांना बायोमेट्रिक ओळखपत्रं देण्याव्यतिरिक्त क्यूआर कोडेड आधार कार्ड देखील देण्यात आली आहेत. आतापर्यंत भारत सरकारकडून 19,16,781 मच्छिमारांना बायोमेट्रिक ओळखपत्रं आणि 12,40,869 मच्छिमारांना क्यूआर कोडेड पीव्हीसी आधार कार्ड देण्यात आली.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1910458)
Visitor Counter : 151