गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नगरपालिकेतील घनकचरा

Posted On: 23 MAR 2023 8:22PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23  मार्च 2023

केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर 2014 रोजी देशभरातील नगरपालिका क्षेत्रातील सर्व घनकचऱ्याची शास्त्रीय प्रक्रियेद्वारे विल्हेवाट लावण्यासाठी  स्वच्छ भारत अभियान-नागरी (SBM-U) ची सुरुवात केली. ह्या अभियानाअंतर्गत केलेली प्रगती पुढे नेण्यासाठी, स्वच्छ भारत मिशन (SBM-U) चा दूसरा टप्पा, 1 ऑक्टोबर 2021 रोजी 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आला आहे.  त्याच्या माध्यमातून सर्व शहरांना कचरामुक्त दर्जा प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून 100% कचरा स्त्रोतांचे पृथक्करण, घरोघरी संकलन आणि वैज्ञानिक लँडफिल्समध्ये सुरक्षित विल्हेवाट लावण्यासह कचऱ्याच्या सर्व घटकांचे शास्त्रीय व्यवस्थापन केले जाते.

सर्व जुन्या कचरा ढीगाऱ्यांवरच्या कचऱ्याचे निराकरण करणे आणि त्यांचे हरित क्षेत्रात रूपांतर करणे हे देखील या अभियानाचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत, निर्माण झालेल्या एकूण कचऱ्यापैकी म्हणजेच 1,52,245 MT/D, एकूण 1,14,183 MT/D (75%) कचऱ्यावर प्रक्रिया केली गेली आहे. उत्पादित आणि प्रक्रिया केलेल्या कचऱ्याचा राज्यनिहाय तपशील जोडला आहे.

नगरपालिकांमधील कचऱ्याच्या प्रक्रियेचे तपशील (https://www.sbmurban.org/storage/app/media/ULBs-SWM-Data.pdf) इथे मिळू शकतात.

‘कचरामुक्त’ शहरांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्पाअंतर्गत प्रस्तावित एकूण महानगरपालिका घनकचरा अंदाजे प्रक्रिया क्षमता खालीलप्रमाणे आहे:

S. No.

Type of MSW plant

Qty, TPD

1

Compost Plants

30,700

2

Biomethanation Plants

15,100

3

MRF-cum-RDF Plants

45,200

4

Waste-to-Electricity (WtE) (RDF based) Plants

9,700

राज्यांना कार्यक्षम अशा महापालिका घनकचरा व्यवस्थापन (MSWM) प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत.

1. राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशातील प्रशासन त्यांच्या घटकानुसार शहर घनकचरा कृती योजना (CSWAP)सादर करतात ज्याच्या आधारावर, घनकचरा व्यवस्थापन (SWM) घटक अंतर्गत केंद्रीय सहाय्य जारी केले जाते.

2. योजना, रचना, कार्यान्वयन आणि देखभाल यासह स्वच्छ भारत अभियानाच्या सर्व पैलूंचा समावेश करणारी विविध नियमावली आणि सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत. 

3. शहराच्या महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाची तटस्थ पक्षांद्वारे पडताळणी करुन त्याद्वारे मूल्यांकन करण्यासाठी कचरा मुक्त स्टार रेटिंग प्रोटोकॉल.

4. विविध क्षमताबांधणी आणि IEC उपक्रम सुरू केले आहेत.

गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1910160) Visitor Counter : 393


Read this release in: English , Urdu