कोळसा मंत्रालय
देशातील कोळसा साठ्यांची उपलब्धता
Posted On:
23 MAR 2023 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2023
कोल इन्व्हेंटरी ऑफ इंडियाने एक एप्रिल 2022 रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोळशाच्या स्त्रोतांची यादी खालीलप्रमाणे आहे:
(संसाधने: दशलक्ष टनांमधे)
Measured
|
Indicated
|
Inferred
|
Total
|
187105.32
|
147252.18
|
27053.96
|
361411.46
|
GSI द्वारे 01 एप्रिल- 2022 रोजी प्रकाशित केलेल्या भारतातील कोळशाच्या यादीनुसार, 1950 पासून 2021-22 पर्यंत देशात एकत्रित कोळसा उत्पादन 18076.13 दशलक्ष टन इतके झाले आहे.
(दशलक्ष टनांमधे)
Year
|
2019-20
|
2020-21
|
2021-22
|
Coal Production
|
602.14
|
596.22
|
622.63
|
कोल इंडिया लिमिटेडने गेल्या तीन आर्थिक वर्षात केलेल्या कोळसा उत्पादनाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
(दशलक्ष टनांमधे)
Year
|
2019-20
|
2020-21
|
2021-22
|
Coal Imported by India
|
248.54
|
215.25
|
208.93
|
कोल इंडिया लिमिटेडने कोळशाचे उत्पादन वाढवण्यासाठी गेल्या काही काळात हाती घेतलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-
1.सीआयएल त्यांच्या भूमिगत खाणींमध्ये, प्रामुख्याने जिथे सतत खाण कामगार असतील तिथे, शक्य असेल तेव्हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचे तंत्रज्ञान अवलंबत आहे. सीआयएलने हायवॉल खाणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करण्याची देखील योजना आखली आहे. तसेच, शक्य असेल तिथे सीआयएल मोठ्या क्षमतेच्या भूमिगत खाणींचेही नियोजन करत आहे.
2.आपल्या ओपन कास्ट म्हणजे खुल्या खाणींमध्ये, सीआयएलने त्यांच्या खाणींमध्ये उच्च क्षमतेचे उत्खनन करणारे, डंपर आणि सरफेस मायनर्स अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान साधनांचा अवलंब केला आहे. सात मोठ्या खाणींमध्ये प्रायोगिक स्तरावर डिजिटायझेशन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
3.सीआयएल ने एमडीओ मोडमध्ये 15 खाणी देखील देऊ केल्या आहेत. पुढे, सीआयएलने महसूल वाटणीच्या आधारावर 30 खंडित/अर्धवट सोडलेल्या खाणी पुन्हा खुल्या करण्यासाठी ऑफर केल्या आहेत.
केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1910039)
Visitor Counter : 182