सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गांसाठीच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी तरतूद वर्ष 2021-22 मधील 250 कोटी रुपयांच्या तुलनेत वर्ष 2022-23 मध्ये वाढून 394.61 कोटी रुपये
Posted On:
22 MAR 2023 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2023
इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBCs) आणि विमुक्त जमाती (DNTs) साठीच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2021-22 साठी अर्थसंकल्पीय तरतूद 250 कोटी रुपये एवढी होती, तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये हीच अर्थसंकल्पीय तरतूद 394.61 कोटी रुपये एवढी वाढवण्यात आली आहे
ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत वर्ष 2021-22 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश पंधराव्या वित्त आयोगाच्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 5.67 कोटी विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करणे आहे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Kane/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1909602)
Visitor Counter : 157