आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल आरोग्यावरील जागतिक परिषदेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी केले समारोपाचे भाषण


डिजिटल आरोग्यासाठी जागतिक संस्थात्मक आराखडा तयार करताना त्याचे खरे फायदे मिळवण्यासाठी विकेंद्री दृष्टिकोनाकडून एकत्रित दृष्टिकोनाकडे जाण्याची गरज डॉ. भारती प्रवीण पवार यांच्याकडून व्यक्त

Posted On: 21 MAR 2023 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2023

"डिजिटल आरोग्याच्या प्रयत्नांसाठी जागतिक संस्थात्मक रचनात्मक चौकट तयार करताना डिजीटल आरोग्याचे खरे फायदे मिळवण्यासाठी विकेंद्रीत दृष्टिकोनाकडून एकत्रित दृष्टिकोनाकडे जाण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी व्यक्त केलं. डिजिटल आरोग्य - सार्वत्रिक आरोग्य संरक्षण शेवटच्या नागरिकापर्यंत घेऊन जाणे या संकल्पनेवर आधारित जागतिक परिषदेच्या समारोपाच्या भाषणात त्या बोलत होत्या. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ – दक्षिण-पूर्व आशिया प्रदेश द्वारे आयोजित भारताच्या जी 20 अध्यक्षपदाअंतर्गत हा उप कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता.

डिजिटल आरोग्य अत्याधुनिक स्तरावर नागरिकांना कशी मदत करू शकते यावर चर्चा केल्याबद्दल सर्व सहभागी देशांचे आणि प्रतिनिधींचे पवार यांनी आभार मानले. धोरण नियोजन आणि कार्यक्रम अंमलबजावणी क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्वही त्यांनी विषद केले. आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. या टप्प्यावर सर्व देश तंत्रज्ञानाच्या एकात्मतेसह त्यांच्या आरोग्यसेवा सेवा वितरणासाठी प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.

या परिषदेच्या माध्यमातून, आपण सदस्य देशांनी सध्या हाती घेतलेल्या डिजिटल आरोग्य उपक्रमांच्या व्यापक कार्यक्रमाचा, आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील डिजीटल उपक्रमांच्या कल्पना आणि नवोन्मेष याचा आढावा घेतला आहे, जे युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज, अर्थात, सर्वांसाठी आरोग्य सेवा, हे उद्दिष्ट पूर्ण करायला मदत करेल, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

या परिषदेतून डिजिटल आरोग्य उपकरणांच्या वाढीला मर्यादा आणणाऱ्या सर्वसामान्य समस्यांसह, डिजिटल परिवर्तनाची आव्हाने, संधी आणि यश देणारे विशिष्ट घटक, याबाबत सहभागी देशांच्या वैयक्तिक जाणीवा आणि अनुभवांवरही या परिषदेत चर्चा झाली, डॉ. पवार यांनी नमूद केले. डेटाविषयक मानकांचा अभाव आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी, या अभियानातील इंटरऑपरेबिलिटी, अर्थात एकमेकांबरोबर काम करण्याच्या क्षमतेला मर्यादा घालणारी ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डिजिटल आरोग्य सेवा कार्यक्रमाचा अवलंब करण्यामधील समस्यांबाबत बोलताना डॉ.पवार म्हणाल्या की, आरोग्य सेवा व्यवस्थेमधील केवळ आपल्याच कामाकडे बघण्याच्या, तुकड्यातुकड्यांमध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे एकाच प्रकारची डिजिटल साधने तयार करण्याचे काम वारंवार केले जाऊन, त्यात वेळ आणि निधीचा अपव्यय होतो.  तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सार्वत्रिक आरोग्य सेवेसा भारताची बांधिलकी प्रदर्शित करताना डॉ. पवार म्हणाल्या, भारताने डिजिटल आरोग्याला विशिष्ट उद्दिष्ट म्हणून प्राधान्य दिले आहे, यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच भर दिला आहे. डिजिटल पब्लिक गुड्स, अर्थात डिजिटल साधने  हा सर्व देशांमध्ये, विशेषतः कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (LMICs) तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वाचा दृष्टीकोन ठरेल.

म्हणूनच, भारताने त्याच्या G20 अध्यक्षतेखालील सर्व डिजिटल आरोग्य उपक्रमांसाठी, ‘डिजिटल आरोग्य सेवेच्या जागतिक उपक्रमा’ द्वारे, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या मार्गदर्शक चौकटीअंतर्गत एक संस्थात्मक चौकट म्हणून अभिसरणाचा एक दृष्टीकोन देखील प्रस्तावित केला आहे."

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयाच्या डिजिटल हेल्थ अँड इनोव्हेशनचे संचालक डॉ. अॅलन लॅब्रिक यांनी, डिजिटल आरोग्य सेवा चौकट प्रदान करण्यासाठी भागधारकांदरम्यान सुरक्षित नेटवर्कच्या मदतीने योजनेच्या पद्धतशीर अंमलबजावणीच्या गरजेवर भर दिला. परिवर्तन आणि त्यासाठी सर्वसहमती मिळवणे, ही एक संथ प्रक्रिया आहे हे लक्षात घेता, आपली रणनीती कायम ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा स्थानिक गरजांसाठी अंगीकार आणि वापर करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

  

 

Jaydevi PS/R.Aghor/Prajna/Rajashree/P.Malandkar

 

 

 

 

  

 

 

 

 

Jaydevi PS/R.Aghor/Prajna/Rajashree/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1909337)
Read this release in: English , Hindi