विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंह यांच्या उपस्थितीत उत्तराखंडमधील देवस्थळ इथे आशियामधील सर्वात मोठ्या 4 मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपचे केले उद्घाटन
आजच्या या ऐतिहासिक घटनेने, भारताला आकाश आणि खगोलशास्त्रीय रहस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि जगाबरोबर त्याचे आदान-प्रदान करण्यासाठी, क्षमतांच्या नव्या उंचीवर नेऊन पोहोचवले: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
21 MAR 2023 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज उत्तराखंडमधील देवस्थळ इथे आशियामधील सर्वात मोठ्या, 4 मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपचे म्हणजे दुर्बिणीचे उद्घाटन केले. यावेळी उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंह उपस्थित होते.
उद्घाटनानंतर बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले बळ, प्रोत्साहन आणि प्राधान्यामुळे वैद्यानिकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात एकामागून एक, जागतिक दर्जाचे मानांकन मिळवणारे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सक्षम आणि बनवले आहे, आणि उत्साह दिला आहे.
आजच्या या ऐतिहासिक घटनेने, भारताला आकाश आणि खगोलशास्त्रीय रहस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि जगाबरोबर त्याचे आदान-प्रदान करण्यासाठी, क्षमतांच्या नव्या उंचीवर नेऊन पोहोचवले आहे, असे ते म्हणाले.
आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस) ने जाहीर केले आहे, की जागतिक दर्जाची 4 मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप (ILMT) आता अवकाशाचा वेध घेण्यासाठी सज्ज आहे. मे 2022 च्या दुसर्या आठवड्यात, या दुर्बिणीने पहिला प्रकाश मिळवला. ही दुर्बीण उत्तराखंडमध्ये नैनिताल इथे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत, ARIES या स्वायत्त संस्थेच्या देवस्थळ इथल्या वेधशाळा परिसरात 2450 मीटर उंचीवर बसवण्यात आली आहे.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, ILMT ही केवळ खगोलशास्त्रीय निरीक्षणांसाठी बनवण्यात आलेली पहिली द्रवरूप मिरर दुर्बीण आहे. देशात सध्या उपलब्ध असलेली ही सर्वात मोठी ऍपर्चर दुर्बीण आहे, तसेच भारतातील पहिली ऑप्टिकल सर्वेक्षण दुर्बीण देखील आहे, असे त्यांनी सांगितले. रोज रात्री आकाशाच्या ठराविक पट्ट्याचे निरीक्षण करताना, ही दुर्बिणी जवळजवळ 10-15 गीगाबाइट डेटा तयार करेल. ILMT द्वारे प्राप्त झालेला अमुल्य डेटा, बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता/मशीन लर्निंग (AI/ML) अल्गोरिदम च्या वापराला परवानगी देईल, आणि ते ILMT च्या मदतीने निरीक्षण केलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी लागू केले जाईल.
Figure 1: A panoramic view of the Devasthal Observatory campus of ARIES at Nainital, Uttarakhand.
Figure 2: Top view of the ILMT located at the Devasthal Observatory of ARIES showing the liquid mercury mirror covered by a thin mylar film.
Figure 3: A colour composite photograph of a small portion of the sky observed with the ILMT through the g, r and i Sloan filters. NGC 4274 Galaxy can be seen in the top right corner.
R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909285)
Visitor Counter : 182