सांस्कृतिक मंत्रालय
सिव्हिल ट्वेंटी इंडिया 2023 च्या स्थापना परिषदेच्या चौथ्या पूर्ण सत्रात ‘अभिनवता आणि तंत्रज्ञानाचे प्रवर्तक म्हणून नागरी संस्था संघटना’ या विषयावर भर
Posted On:
21 MAR 2023 6:40PM by PIB Mumbai
नागपूर, 21 मार्च 2023
नागपूर मध्ये सुरु असलेल्या सिव्हिल ट्वेंटी (सी-20) इंडिया 2023 च्या प्रारंभिक परिषदेच्या चौथ्या पूर्ण सत्रात ‘अभिनवता आणि तंत्रज्ञानाचे प्रवर्तक म्हणून नागरी संस्था संघटना’ या विषयावर विचारमंथन झाले. सिव्हिल 20 इंडिया, 2023 चे शेर्पा, माजी राजदूत विजय नांबियार या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. या सत्रात सिव्हिल 20 इंडिया 2023 च्या पुढील कार्यकारी गटांचा समावेश होता: तंत्रज्ञान, सुरक्षा आणि पारदर्शकता; पारंपारिक कलांचे जतन आणि संवर्धन,उपजीविका आणि रोजगाराचे मूलगामी आणि नाविन्यपूर्ण मार्ग; शिक्षण आणि डिजिटल परिवर्तन. या अधिवेशनात अर्थविषयक विशेष समितीचाही समावेश करण्यात आला होता.
इंटेल कॉर्पोरेशनचे संचालक अॅलिसन लिन रिचर्ड्स, दस्तकारी हाट समितीच्या अध्यक्ष आणि संस्थापक, जया जेटली, इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रामिंग कॉन्टेस्ट (ICPC) ग्लोबल फाउंडेशनच्या विकास संचालक वेरोनिका सोबोलेवा, सिव्हिल 20 इंडिया 2023 आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्य बिन्नी बुचोरी आणि एकिबेकीच्या संस्थापक विश्पला हुंडेकरी यांचा सत्रातील वक्त्यांमधे समावेश होता.
सिव्हिल 20 इंडिया, 2023 चे शेर्पा, माजी राजदूत विजय नांबियार, नागपूर मध्ये आयोजित सिव्हिल ट्वेंटी इंडिया 2023 च्या स्थापना परिषदेच्या चौथ्या पूर्ण सत्राच्या अध्यक्षस्थानी
अमृता विश्व विद्यापीठमच्या अधिष्ठाता डॉ. कृष्णश्री अच्युथन आणि अमृता क्रिएटच्या संस्थापक संचालक डॉ. प्रेमा नेदुंगडी या कार्यगटांच्या समन्वयकांनी सत्रात भाषण केले. आर्थिक समस्यांवरील विशेष समितीच्या निमंत्रक असलेल्या द्वारा रिसर्चच्या दीप्ती जॉर्ज यांनीही सत्रादरम्यान भाषण केले.
डॉ. कृष्णश्री अच्युथन म्हणाल्या की, डिजिटल जग या दुस-या जगातही आपल्या सर्वांची खोलवर छाप आहे. तंत्रज्ञान हे वास्तव आणि डिजिटल जग यांच्यातील सेतू आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यापूर्वी त्याचा नकारात्मक प्रभावही तपासला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. सायबर सुरक्षेच्या महत्त्वाविषयी त्यांनी मत मांडले. सायबर महामारी ही कोविड -19 महामारीपेक्षा कितीतरी जास्त गंभीर असेल. तंत्रज्ञान अधीनता हा आणखी एक चिंतेचा मुद्दा आहे. तंत्रज्ञान हा नोकर म्हणून चांगला आहे पण मालक म्हणून धोकादायक असे त्या म्हणाल्या.
विशाला हुंडेकरी म्हणाल्या की, आज भारतातील सुमारे 200 हस्तकला धोक्यात आल्या आहेत. हस्तकलेच्या बाबतीत, दोन समस्या आहेत, पहिली मागणीच्या बाजूने, अस्सल हस्तकलेबद्दल जागरूकता नसणे आणि दुसरी पुरवठ्याच्या बाजूने, कारागिरांकडे पुढे जाण्याची आर्थिक क्षमता नाही. आपण हस्तकलेचा वापर सामाजिक बदलाचे साधन म्हणून करू शकतो असे त्यांनी सांगितले.
डॉ प्रेमा नेदुंगडी म्हणाल्या की त्यांचा कार्य गट शिक्षणातील खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आहे: जीवन आणि जागतिक नागरिकत्वासाठी शिक्षण, अपंग व्यक्तीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, अध्ययनातील समानता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल परिवर्तन आणि डिजिटल सुलभता तसेच आपत्कालीन परिस्थितीत शिक्षण. त्यांचा कार्य गट ‘दिव्यांग व्यक्तींबाबत जागृती अभियान’ देखील राबवत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
नागरी समाज संघटना: नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचे संवाहक या विषयावर आयोजित पूर्ण सत्रात अमृता विश्व विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगच्या अध्यक्ष डॉ.प्रेमा नेदुंगडी यांनी आपले विचार मांडले
आर्थिक व्यवस्थेने सरकारी तसेच उद्योगव्यवसायांना शक्तिशाली बनवले. आर्थिक आघाडीवरील आव्हाने आता अधिकाधिक गुंतागुंतीची होत जाणार आहेत. आर्थिक दरी ही मोठी अडचण आहे आणि विकसनशील देशांना त्यांच्या धोरणात्मक निर्णयात अनेक परस्परविरोधीबाबींचा समावेश करावा लागतो असं दीप्ती जॉर्ज म्हणाल्या. जी 20 ने नवनवीनआर्थिक साधनाचा विकास घडवून आणण्यावर भर देणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक यंत्रणेतून विकसनशील देशांना थारा नसणे याची दखल घेतली जायला हवी. कर्जमुक्त करण्यासाठी मानवीय यंत्रणा असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
एलिसन लीन रिचर्ड म्हणाल्या G20 चा यावर्षी अध्यक्ष असणारा भारत हा जगाचे हृदय तसेच आत्मा आहे. त्यानंतर त्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीविषयी बोलताना म्हणाल्या की भूतकाळातील कादंबऱ्यांमध्ये जे लिहिले होते ते आता प्रत्यक्षात आलेले दिसते आहे. तंत्रज्ञानाचे भविष्य अतिशय वेगाने विकास पावत आहे. तरीसुद्धा या तंत्रज्ञानाची एक काळी बाजूही आहे. तंत्रज्ञानाचे व्यसनलागणे किंवा त्यामाध्यमातून होणारी फसवणूक (फिशिंग) ही त्याची उदाहरणे आहेत . सायबर हल्ले वेगाने वाढत आहेत. खास करून ज्येष्ठ व्यक्तींचा फायदा घेतला जातो. चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे.
हस्तकला आणि कलेसंबंधित विषय यांचा या बैठकीत चर्चिले जात बनत असल्याबद्दल जया जेटली यांनी समाधान व्यक्त केले . हस्तकला म्हणजे केवळ सजावटीच्या वस्तू हा वसाहतवादातून हस्तकलेबद्दल आलेला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. भारताला समजून घेण्यासाठी भारताचा हस्तव्यवसाय समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज हस्त व्यवसायातून निर्माण होणाऱ्या वस्तू या केवळ उत्पादन ठरल्या असून त्यातून सांस्कृतिक संदर्भ/घटक हरवला आहे असंही त्यापुढे म्हणाल्या.
दस्तकार हाट समितीच्या अध्यक्ष आणि संस्थापक जया जेटली या 'सामाजिक नागरी संस्था : संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या वाहक' या विषयावरील संपूर्ण सत्रात C20 प्रारंभिक बैठकीच्या दुसऱ्या दिवशी बोलत होत्या
वेरोनिका सोबोलेवा यांनी शिक्षण आणि डिजिटल रूपांतरणाच्या क्षेत्रात नागरी सामाजिक संस्था च्या भूमिकेबद्दल सांगितले. नागरी सामाजिक संस्था या समाजाशी जोडलेल्या असतात आणि मुलगामी स्तरावर त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर त्या काम करत असल्यामुळे शिक्षणात बदल आणण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करू शकतात. नागरी सामाजिक संस्था या तंत्रज्ञानाचाही विकास करू शकतात असे त्या म्हणाल्या .
वेरोनिका सोबोलेवा या आयसीटीसी ग्लोबल फाउंडेशन या संस्थेच्या विकास संचालक आहेत नागरी सामाजिक संस्था नवसर्जन आणि तंत्रज्ञानाच्या वाहक या विषयावर नागपूरात आयोजित संपूर्ण सत्रातील c20 प्रारंभिक बैठकीच्या दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वंकष प्रगती झाल्यानंतर अजूनही काही देश यात मागे आहेत. आर्थिक बळ नसल्यामुळे येणाऱ्या या डिजिटल दरीची दखल आपण घ्यायला हवी असे बिन्नी बुचोरी म्हणाल्या.
RA/JPS/Bhakti/Vinayak/Vijaya/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909238)
Visitor Counter : 286