श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने जानेवारी 2023 मध्ये 14.86 लाख एकूण सदस्य केले

Posted On: 20 MAR 2023 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने आज जाहीर केलेल्या कर्मचाऱ्यांचा तात्पुरत्या पगार पत्रकातील माहिती नुसार संस्थेने जानेवारी 2023 मध्ये 14.86 लाख सदस्य केले

या महिन्यात जोडल्या गेलेल्या 14.86 लाख सदस्यांपैकी 7.77लाख सदस्य प्रथमच कर्मचारी भविष्य निर्वाह कार्यालयाच्या कक्षेत आले आहेत. नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सर्वाधिक कर्मचारी 18 ते 21 वयोगटातील नोंदणीकृत कर्मचारी आहेत. त्यांची संख्या 2.26लाख आहे. 22 ते 25 वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या त्या खालोखाल म्हणजे या वयोगटात 2.06 लाख सदस्य आहेत. या महिन्यात झालेल्या एकूण सदस्य संख्येच्या नोंदणी पैकी 18 ते 25 वयोगटातील सदस्यांची टक्केवारी 55.52% आहे. यावरून असे दिसून येते की प्रथम नोकरीच्या शोधात असलेल्या रोजगार इच्छुकानी देशातील संघटित कामकाज क्षेत्र निवडले आहे. जानेवारी 2023 मध्ये फक्त 3.54 लाख सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कक्षेतून बाहेर पडले. कक्षेतून बाहेर पडणाऱ्यांची ही संख्या चार महिन्यातील ही सर्वात कमी संख्या आहे.

या माहितीतून असे दिसून येत आहे की 10.62 लाख सदस्यांनी भविष्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची सदस्यता पुन्हा घेतली आहे. या सदस्यांनी त्यांचे रोजगार बदलून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या दुसऱ्या रोजगाराची निवड केली आणि आपला निधी अंतिम पगार म्हणून घेण्याऐवजी संस्थेत वळवून घेण्याचा पर्याय स्वीकारला. जेणेकरून त्यांचे सामाजिक सुरक्षेचं संरक्षण वाढीला लागेल.

या पगार पत्रकाच्या माहितीचे लिंगनिहाय विश्लेषण केल्यास जानेवारी 2023 मध्ये एकूण स्त्री सदस्यांची संख्या 2.87 लाख दिसते. यावरून त्यापैकी 1.97 लाख स्त्री सदस्य या नव्याने आलेल्या आहेत. यावरून असे दिसते 68.61 % एकूण स्त्री सदस्य प्रथमच कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाच्या कक्षेत आले आहेत.

राज्यनिहाय संख्या कर्नाटक, उत्तर प्रदेश, ओरिसा, दिल्ली, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यात दर महिन्याला वाढताना दिसते. एकूण सदस्य संख्या वाढीच्या बाबतीत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, आणि दिल्ली ही पाच राज्ये आघाडीवर आहेत. या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्र 22.73% सदस्य संख्या वाढीसह आघाडीवर आहे तर त्यामागे असणाऱ्या कर्नाटकातील सदस्य संख्या 10.58%नी वाढली आहे.

उद्योग क्षेत्रनिहाय सदस्य संख्येची छाननी केली तर निर्यात सेवेतील सदस्य संख्या 40.64% नी वाढली आहे. या सेवांमध्ये रोजगारासाठी पुरवठा करणारे, सर्वसाधारण कॉंन्ट्रॅक्टर , सुरक्षा सेवा आणि इतर कामकाज यांचा समावेश होतो. गेल्या महिन्यातील उद्योगनिहाय माहितीची तुलना केली तर मोटार सर्विसिंग उद्योग, राष्ट्रीयकृत बँका सोडून इतर बँका , उपहारगृह, चहाचे मळे इत्यादी ठिकाणच्या उद्योगातून जास्त सदस्य मिळाल्याचे दिसून येते.

पगार पत्रक माहिती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्यामुळे ही माहिती तात्पुरती आहे. प्रत्येक महिन्यात आधीच्या माहितीचे अद्ययावतीकरण होत असते. एप्रिल 2018 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय 2017 सप्टेंबर नंतरच्या कालावधीचा समावेश असलेला पगार पत्रक माहिती सामायिक करत आहे. मासिक पगार पत्रक माहिती मध्ये आधार प्रमाणेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर च्या माध्यमातून प्रथमच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी च्या कक्षेत येणाऱ्या सदस्यांचे संख्या कक्षेतून बाहेर पडलेले सदस्य आणि पुनर्प्रवेश करणाऱ्या सदस्यांची संख्या महिन्याला मिळू शकते.

कर्मचारी भविष्य निर्वाह काळ संस्था ही सामाजिक सुरक्षा संस्था आहे. या संस्थेकडे देशातील संघटित कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि इतर तरतुदी कायदा 1952 च्या तरतुदी अंतर्गत समावेश असलेल्या भविष्य निर्वाह निधी निवृत्ती वेतन आणि विमा निधीच्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करण्याची जबाबदारी आहे.

 

 

 

 

 

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1908982) Visitor Counter : 239


Read this release in: English , Urdu , Telugu