खाण मंत्रालय
ओदिशा जिल्ह्यात सोन्याचे साठे
Posted On:
20 MAR 2023 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2023
भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसआय), फील्ड सीझन प्रोग्राम [एफएसपी] 2018-19 दरम्यान, ओदिशाच्या देवघर जिल्ह्यातील अडश खाणीत धातू उत्खननासाठी 'सामान्य अन्वेषण' (G2) करण्यात आले ज्यामध्ये तांबे या धातूसोबत सोनेही आढळून आले. जीएसआयने अडश खाणीत 0.97 पीपीएम सोन्याचे खनिज असलेला 0.90 मेट्रिक टन साठा शोधला आहे. लिलावासाठी संसाधन-संपन्न भूवैज्ञानिक अहवाल ओदिशा राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. खाणीच्या लिलावानंतर, सूचित संसाधन यशस्वी बोलीदारांद्वारे खाणयोग्य राखीव क्षेत्र श्रेणीसुधारित केले जाऊ शकते.
कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1908892)