आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खाजगी  सरकारी भागीदारी मॉडेलवर आधारित वैद्यकीय महाविद्यालयाविषयीची अद्ययावत माहिती

Posted On: 17 MAR 2023 5:12PM by PIB Mumbai

 

सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास राष्ट्रीय वैद्यकीय  नियामक आयोगाने  (पूर्वीचे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) परवानगी दिली आहे.

सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवली आहेत्याचबरोबर एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ केली आहे. 2014 या वर्षांपूर्वी 387 मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आता 660 वर गेली आहे , या संख्येत 71 टक्क्यांची वाढ झाली आहे.  याशिवाय एमबीबीएस जागांमध्ये 2014 पूर्वी  51,348 जागा होत्या त्या आता 101,043 वर गेल्या आहेत म्हणजे या जागांमध्ये 110 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय पदव्युतर वैद्यकीय शिक्षणाच्या2014  पूर्वी असलेल्या 31,185 जागा आता 65,335  झाल्या आहेत . या जागांमध्ये डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड/ फेलोशिप ऑफ नॅशनल बोर्ड पदव्युत्तर ला 13,246 जागा, कॉलेज ऑफ फिजिशन्स अँड सर्जन मध्ये 1621 पदव्युत्तर जागा यांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत लेखी प्रश्नांच्या उत्तरादाखल ही माहिती दिली.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1908243) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Urdu