आयुष मंत्रालय

सरकार आरोग्य पर्यटनाच्या माध्यमातून आयुष उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नरत

Posted On: 17 MAR 2023 6:27PM by PIB Mumbai

 

देशातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने 'हील इन इंडिया' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच आयुष मंत्रालय, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (CDAC) आणि सर्व्हिसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (SEPC) यांच्या सहकार्याने वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'वन स्टेप' हील इन इंडिया पोर्टल विकसित करण्याचे काम करत आहे. 

आयुष मंत्रालयाने, भारत पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन मंत्रालयासह आयुर्वेद आणि इतर पारंपारिक औषध प्रणालींतील वैद्यकीय पर्यटनाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने एकत्र काम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

आयुष मंत्रालयाने वैद्यकीय मूल्य पर्यटन चॅम्पियन सर्व्हिस सेक्टर स्कीम नावाची केंद्रीय क्षेत्र योजना विकसित केली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन (NCISM) कायदा, 2020 किंवा नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी (NCH) कायदा, 2020 या कायद्यातील तरतुदीनुसार सुपर स्पेशालिटी रुग्णालय / डे केअर सेंटर स्थापित करणाऱ्या खाजगी गुंतवणूकदारांना व्याजातील सवलतीच्या रुपात आर्थिक मदत दिली जात आहे. 

'हील इन इंडिया' आणि 'हील बाय इंडिया' ला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दोन चिंतन शिबिरांचे आयोजन केले होते. या चिंतन शिबिरात आयुष मंत्रालयही सहभागी झाले होते. भारतातील पर्यटनाच्या माध्यमातून पारंपारिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपायांची चाचपणी या शिबिरात करण्यात आली.

वैद्यकीय मूल्य पर्यटनात भारताला प्रथम क्रमांकाचे गंतव्यस्थान म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी गांधीनगर, गुजरात येथे झालेल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेदरम्यान भारतातील आरोग्य क्षेत्रावर एक गोलमेज परिषद आणि पूर्ण सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.

आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय संस्थांची आणि रुग्णालयांची यादी खाली दिली आहे.

 

S.No.

Name of Institute

Location

Name of the State/UT

1

Institute of Teaching & Research in Ayurveda

 Jamnagar

Gujarat

2

National Institute of Ayurveda Jaipur

Jaipur

Rajasthan

3

All India Institute of Ayurveda

New Delhi

New Delhi

4

North Eastern Institute on Ayurveda & Homoeopathy

Shillong

Meghalaya

5

North Eastern Institute of Folk Medicine

Pasighat

Arunachal Pradesh

6

National Institute of Homoeopathy

Kolkata

West Bengal

7

National Institute of Unani Medicine

Bengaluru

Karnataka 

8

National Institute of Naturopathy

Pune

Maharashtra

9

National Institute of Siddha

Chennai

Tamil Nadu

10

National Institute of Sowa Rigpa

Leh

Ladakh

 

आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908093) Visitor Counter : 136


Read this release in: English , Urdu