संरक्षण मंत्रालय
ला पेरोज - 2023 युद्धसराव
Posted On:
16 MAR 2023 8:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2023
भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची गायडेड मिसाईल फ्रिगेट, आयएनएस सह्याद्री आणि नौदलाच्या ताफ्यातील टँकर , INS ज्योतीने 13 - 14 मार्च 2023 या कालावधीत आयोजित केलेल्या ला पेरोज या बहुपक्षीय युद्धसरावाच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये भाग घेतला. हा सराव हिंदी महासागर क्षेत्रात आयोजित करण्यात आला होता आणि त्याचे उद्दिष्ट आशिया-प्रशांत प्रदेशातील सहभागी नौदलांमधील सागरी क्षेत्रातील जागरुकता आणि सागरी समन्वय वाढवणे हा होता.
भारतीय नौदलाच्या जहाजांव्यतिरिक्त, या सरावात रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाचे HMAS Perth, फ्रेंच नौदलाचे FS Dixmude आणि FS La Fayette, जपानी सागरी सेल्फ डिफेन्स फोर्सचे जहाज JMSDF जहाज सुझुत्सुकी तसेच टाइप SH 60 J हेलिकॉप्टर, HMS Tamar,रॉयल नेव्ही आणि अमेरिकन नौदलाकडून यूएसएस चार्ल्सटन यांचा सहभाग होता. या दोन दिवसीय सरावाने सर्व सहभागी नौदलांना जटिल आणि प्रगत नौदल कारवायांच्या सरावाची संधी दिली. ज्यामध्ये समुद्रात इंधन पुनर्भरण, पृष्ठभागावरील युद्ध कवायती, हवाई आणि हवाई संरक्षण-विरोधी सराव, क्रॉस डेक हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि सामरिक युद्धाभ्यास यांचा समावेश होता.
आयएनएस सह्याद्री, ही स्वदेशी बनावटीची आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्रसज्ज असलेली लहान युद्धनौका आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्स बसवले आहेत. ज्यामुळी ही युद्धनौका हवेतील, पृष्ठभागावरील आणि उप-पृष्ठभागावरील धोक्यांचा आधीपासून शोध घेण्यात आणि असे हल्ले निष्प्रभ करण्यात सक्षम बनते. आयएनएस ज्योती हा नौदलाच्या ताफ्यातील टँकर असून तो ताफ्याला समुद्रात दीर्घकाळ इंधन पुरवठा करण्यासाठी उपयुक्त आहे. ही दोन्ही जहाजे विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याचा एक भाग आहेत आणि पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफच्या आदेशानुसार कार्य करतात.
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1907761)
Visitor Counter : 161