नागरी उड्डाण मंत्रालय
नवी मुंबई, विजयपुरा, हसन, नोएडा (जेवार), हिरासर आणि धोलेरा हरित क्षेत्र विमानतळ पुढील तीन वर्षांत होणार कार्यान्वित
21 नवीन हरित क्षेत्र विमानतळांच्या उभारणीस तत्वतः मान्यता
Posted On:
16 MAR 2023 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2023
सरकारने 21 नवीन हरित क्षेत्र विमानतळांच्या उभारणीसाठी 'तत्त्वतः' मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, शिर्डी आणि सिंधुदुर्ग, गोव्यातील मोपा, कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपुरा, हसन आणि शिवमोग्गा, मध्य प्रदेशातील डाबरा (ग्वाल्हेर), उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि नोएडा (जेवार), गुजरातमधील धोलेरा आणि हिरासर, पुद्दुचेरीतील कराईकल, आंध्र प्रदेशातील दगडार्थी, भोगपुरम आणि ओरवाकल (कुर्नूल), पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पॅक्योंग, केरळमधील कन्नूर आणि होलोंगी, अरुणाचल प्रदेशातील इटानगर या विमानतळांचा समावेश आहे.
यामध्ये 11 हरित क्षेत्र विमानतळांचा समावेश असून त्यापैकी गेल्या तीन वर्षांत 6 विमानतळांवरून विमान उड्डाण सुरू झाले आहे. उदारहरणार्थ 2021 मध्ये ओरवकल (कुर्नूल), सिंधुदुर्ग आणि कुशीनगर येथील विमानतळांचे काम सुरू झाले तर 2022 मध्ये इटानगरमधून विमानांचे उड्डाण होऊ लागले आहे. 2023 मध्ये मोपा आणि 2023 मध्ये शिवमोग्गा विमानतळे कार्यान्वित झाली आहेत.
मंत्रालयाने ज्या विमानतळांना तत्वतः मान्यता दिली आहे, त्यामध्ये नवी मुंबई, विजयपुरा, हसन, नोएडा (जेवार), हिरासर आणि ढोलेरा या हरित क्षेत्र विमानतळांचा समावेश आहे. यांचे काम आगामी तीन वर्षांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तथापि, विमानतळांच्या बांधकामांना लागणारा कालावधी हा संबंधित विमानतळ विकासकांद्वारे भूसंपादन, अनिवार्य मंजुरी, इतर अडथळे दूर करणे, आर्थिक ताळेबंदी इत्यादी विविध घटकांवर अवलंबून आहे.
विमानतळ हे आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून उदयास आले आहे आणि त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर गुणात्मक प्रभाव पडतो. नागरी विमान वाहतूक क्षेत्र आणि आर्थिक वाढ यांच्यातील दुवा चांगल्या प्रकारे ओळखला जातो. ‘इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (आयसीएओ) च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हवाई संपर्क यंत्रणा जर उत्तम असेल त्यामुळे आर्थिक विकास 3.1 गुणकाच्या पटीत होतो. तसेच रोजगाराच्या संधी वाढतात. विमानतळ असलेल्या परिसरामध्ये रोजगाराच्या संधी 6.1गुणकाच्या पटीत वाढतात.
देशभरातल्या विमानतळांच्या स्थितीविषयी माहिती नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी आज लोकसभेमध्ये एका लेखी उत्तरामध्ये दिली.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1907744)