अंतराळ विभाग
गगनयान मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 9023 कोटी रूपयांची तरतूद : केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची लोकसभेत माहिती
Posted On:
15 MAR 2023 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2023
गगनयान मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 9023 कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मानवी अंतराळ उड्डाण करणे आणि सुरक्षित परत येण्याची क्षमता दाखवणे हे गगनयान कार्यक्रमाचे कार्यक्षेत्र आहे, असे ते म्हणाले. ह्युमन रेटेड लॉन्च व्हेईकल, हॅबिटेबल क्रू मॉड्यूल, लाईफ सपोर्ट सिस्टीम, क्रू एस्केप सिस्टम, ग्राउंड स्टेशन नेटवर्क, क्रू ट्रेनिंग आणि रिकव्हरी यासाठी इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करत आहे. गगनयान मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि यापुढील कोणत्याही आंतरग्रहीय मोहिमा हाती घेण्यासाठी ही तंत्रज्ञाने महत्त्वपूर्ण आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भारतातील अंतराळ क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी, अधिकृत मान्यता देण्यासाठी आणि त्यांच्यावर देखरेखीसाठी सरकारने एकल खिडकी एजन्सी म्हणून इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (इन-स्पेस) ची स्थापना केली आहे. देशातील अंतराळ क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड [एनएसआयएल] ची भूमिकाही व्यापक करण्यात आली आहे. अंतराळातील कृतींसाठी वाणिज्य-केंद्रित दृष्टीकोन मांडण्यात आला आहे. अंतराळ विभाग एक सर्वसमावेशक, व्यापक अंतराळ धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे संपूर्ण अवकाश परिसंस्थेला आणखी चालना मिळेल.
* * *
S.Bedekar/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1907288)
Visitor Counter : 201