वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सिक्कीमची समृध्द सेंद्रीय शेती जगासमोर आणणारी B20 परिषद उद्यापासून गंगटोक इथे सुरु होणार

Posted On: 14 MAR 2023 8:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2023

सिक्कीममध्ये गंगटोक इथे उद्यापासून 17 मार्चपर्यंत होणाऱ्या  तिसऱ्या B20 परिषदेच्या माध्यमातून सिक्कीमची बहरलेली सेंद्रीय शेती जगासमोर प्रामुख्याने प्रदर्शित केली जाईल. या परिषदेत पर्यटन, आदरातिथ्य आणि औषध निर्माण या क्षेत्रांतील बहुपक्षीय व्यवसाय भागीदारीच्या संधींवरही भर दिला जाईल.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) ईशान्य प्रदेशात चार B20 परिषदांचे आयोजन केले असून, या भागातील सुप्त क्षमता आणि संधी प्रकाशात आणणे, हे याचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी इम्फाळ आणि ऐझवाल येथे यापैकी दोन परिषदा आयोजित करण्यात आल्या असून, तिसरी परिषद गंगटोक इथे आणि चौथी कोहिमा इथे होणार आहे. 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत, डीपीआयआयटीच्या वरिष्ठ सल्लागार, रूपा दत्ता यांनी आज पत्रकार परिषदेत बिझनेस 20, अर्थात व्यवसाय 20 आणि त्याच्या कार्य पद्धतीबद्दल तपशीलवार सादरीकरण केले. गंगटोक, सिक्कीम इथल्या आगामी B20 परिषदेवर विशेष लक्ष केंद्रित करून, B20 मधील महत्त्वाच्या कार्यक्रमांचे वेळापत्रकही यावेळी सादर करण्यात आले. सिक्कीम इथले B20 परिषदेचे आयोजन, राज्याची समृध्द सेंद्रिय शेती जगासमोर प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल.

स्टार्टअप 20 इंडिया चे अध्यक्ष आणि अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोगाचे मिशन संचालक, डॉ. चिंतन वैष्णव  यांनी स्टार्टअप 20 वर एक सादरीकरण दिले. भारताच्या 2023 अध्यक्षपदा अंतर्गत, हा नवीन अधिकृत प्रतिबद्धता गट आहे. त्यांनी सांगितले की गंगटोकमधील स्टार्टअप 20 जागतिक स्टार्ट अप परिसंस्था मजबूत करण्याच्या उपायांवर विचार करेल, ज्यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामर्थ्यवान देश म्हणून उदयाला आला आहे.

G20 चे दोन ट्रॅक आहेत- शेर्पा ट्रॅक आणि फायनान्स ट्रॅक. शेर्पा ट्रॅक मध्ये 13 कार्यकारी गट आणि 11 प्रतिबद्धता गट आहेत. व्यवसाय 20 ची स्थापना 2010 मध्ये झाली असून, तो जागतिक व्यापारी समुदायाचा समावेश असलेला अधिकृत G20 संवाद मंच आहे. आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देण्यासाठी प्रत्येक अध्यक्षपदाच्या प्राधान्यक्रमांवर ठोस कृती करता येण्याजोग्या धोरण शिफारसी देणे, हे B20 चे उद्दिष्ट आहे. B20 मध्ये एकूण 100 बैठका आयोजित करण्यात आल्या असून, यापैकी प्रत्यक्ष बैठकांची संख्या 65 आहे आणि हायब्रिड, अर्थात ऑफलाईन-ऑनलाईन माध्यमातील बैठकांची संख्या 35 आहे.

भारताच्या G20 अध्यक्षतेखाली, स्टार्टअप 20 ची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक स्टार्टअप परीसंस्थेच्या भागधारकांसाठी हा संवाद मंच असून, G20 नेत्यांसह उद्योजकांसमोरची आव्हाने मांडण्यासाठी जगातिक स्टार्टअप परीसंस्थेचे प्रतिनिधित्व करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.  स्टार्ट-अप 20 प्रतिबद्धता गटाच्या एकूण 60 बैठका होणार असून, त्यापैकी 5 बैठका प्रत्यक्ष होणार आहेत. सिक्कीम मध्ये गंगटोक इथे 18-19 मार्च 2023 रोजी स्टार्टअप 20 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

B20 ची प्रमुख परिषद 26-27 ऑगस्ट 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे आणि 2-4 जुलै 2023 दरम्यान गुरुग्राममध्ये स्टार्टअप 20 ची प्रमुख परिषद होणार आहे.

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1906948) Visitor Counter : 166


Read this release in: English , Urdu , Hindi