गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

एनवायसी 2023- “ 2047 पर्यंत भारताला जगाचा नेता बनवण्यासाठी युवा शक्ती चालना देईल”- हरदीप सिंग पुरी

Posted On: 13 MAR 2023 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2023

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी युवा वर्गाला हवामान बदल, कामाचे भवितव्य आणि लोकशाहीमध्ये युवा वर्गाची भूमिका यांसारख्या मुद्यांवर आपल्या चिंता अधिक तीव्रतेने मांडण्यासाठी या परिसंवादाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल या कार्यक्रमाची प्रशंसा केली. देशामध्ये स्टार्ट अप्सचा विस्फोट हे देशातील युवा वर्गाला अलीकडच्या काही वर्षांमध्ये प्रेरणा देणाऱ्या  उद्यमशीलतेच्या संस्कृतीचा दाखला आहे, असे ते म्हणाले.

विकासाचे नेतृत्व करणाऱ्या युवा वर्गाविषयी बोलताना ते म्हणाले की दरवर्षी युवा विकास कार्यक्रमांसाठी सरकार 90 हजार कोटी रुपये खर्च करते. पुरी यांनी शहरी विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा वर्गाच्या नवोन्मेषावर आधारित अनेक ज्ञान उत्पादनांचे अनावरण केले. एनवायसी 2023 आयोजित करण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशन, एनआययूए आणि युवा शक्ती यांच्या एकत्रित प्रयत्नांची प्रशंसा करताना ते म्हणाले की आपल्याकडे असलेल्या युवा वर्गाच्या लाभांशामुळे 2047 पर्यंत भारत सर्वच क्षेत्रात जागतिक नेता बनेल, असा आपल्याला विश्वास वाटतो.

भारताच्या जी 20 अध्यक्षतेच्या छत्रांतर्गत राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्थेने केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज मिशन  आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एनवायसी-2023 मध्ये केंद्रीय मंत्री बोलत होते.

या परिसंवादाने यू 20 आणि वाय 20 च्या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांवर विचारमंथन करण्यासाठी आणि भविष्यातील तेजस्वी नेतृत्व घडवण्यासाठी युवा विचारवंतांना आज एकत्र आणले. प्रश्नमंजुषा आणि वादविवाद स्पर्धा, चर्चा, हवामान बदल आणि परस्पर संवाद साधणारी चर्चासत्रे यांच्या माध्यमातून युवा वर्गाला या कार्यक्रमात लोकशाहीची प्रक्रिया समजून घेता आली. या राष्ट्रीय संमेलनात  विद्यार्थी आणि युवा व्यावसायिक, तज्ञ आणि देशभरातून आलेले नवोन्मेषकर्ते शहरी भारताला भेडसावत असलेल्या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी, सहकार्यासाठी आणि त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी एकत्र आले.

वाय20 बाबत अधिक जाणून घेण्यासाठी : https://y20india.in येथे क्लिक करा.


S.Kane/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1906599) Visitor Counter : 148