नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

आयआरईडीएला आरबीआयकडून मिळाला ‘पायाभूत सुविधा अर्थसहाय्य कंपनी’ चा दर्जा

Posted On: 13 MAR 2023 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2023

भारतीय रिझर्व बँक आरबीआयने भारतीय नूतनक्षम ऊर्जा विकास एजन्सी(आयआरडीईए) या कंपनीला पायाभूत सुविधा अर्थसहाय्य कंपनी(आयएफसी) हा दर्जा प्रदान केला आहे. या पूर्वी या कंपनीची गणना ‘ गुंतवणूक आणि कर्ज कंपनी(आयसीसी)’ म्हणून होत होती. 

आयएफसी हा दर्जा मिळाल्यामुळे आता आयआरडीईए ही कंपनी नूतनक्षम ऊर्जा प्रकल्पांच्या अर्थसहाय्यामध्ये जास्त व्यापक भूमिका बजावू शकेल.  आयएफसी दर्जामुळे या कंपनीला निधी संकलनासाठी गुंतवणूकदारांच्या क्षेत्राच्या हाताळणीची व्याप्ती वाढवता येईल ज्यामुळे निधी उभारणीसाठी स्पर्धात्मक दर मिळतील.आयआरडीईएला आयएफसी म्हणून मान्यता मिळाल्यामुळे गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास देखील उंचावेल, ब्रँड व्हॅल्यू वाढेल आणि बाजारात सकारात्मक दृष्टीकोन तयार होईल.

आयआरईडीएला मिळालेला आयएफसी हा दर्जा म्हणजे गेली 36 वर्षे आयआरईडीएने नूतनक्षम ऊर्जेच्या विकासावर लक्ष केंद्रित करत पायाभूत सुविधा प्रकल्पांना केलेले अर्थसाहाय्य आणि विकासाचा सन्मान आहे. आयएफसी या दर्जामुळे आयआरईडीएला भारत सरकारच्या 2030 पर्यंत बिगर जीवाश्म इंधनांद्वारे 500 गिगावॉटची स्थापित क्षमता प्राप्त करण्याच्या उद्दिष्टामध्ये योगदान देणे सुरू ठेवता येईल. ‘आयआरडीईए’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार व्यास म्हणाले, “ आयआरडीईएसाठी आयएफसी हा दर्जा म्हणजे अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यामुळे नूतनक्षम ऊर्जा क्षेत्रातील आघाडीचे अर्थपुरवठादार म्हणून आमचे स्थान कायम ठेवणे शक्य होणार आहे. नूतनक्षम ऊर्जा क्षेत्राच्या विकासामध्ये एका मातेसमान भूमिका बजावणे आयआरडीईए सुरूच ठेवेल.”

 

Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1906595) Visitor Counter : 177


Read this release in: English , Hindi , Tamil