गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

एनवायसी 2023- शहरी विकासात युवा वर्गाची भूमिकाः संकल्पना प्रत्यक्षात आणताना


वाय-20 भारत परिषद भारताच्या युवा केंद्रित प्रयत्नांचा दाखला देणार

Posted On: 12 MAR 2023 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2023

 

राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्थेच्या वतीने स्मार्ट सिटीज मिशन, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्रालयाचा युवा व्यवहार विभागाच्या सहकार्याने- राष्ट्रीय युवा परिसंवाद(नॅशनल यूथ कॉन्क्लेव) या भारताच्या सर्वात मोठ्या युवा शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. भारताच्या जी20 अध्यक्षतेच्या कक्षेंतर्गत अर्बन20 आणि यूथ20 या परस्परसंपर्क गटांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय ही दोन्ही मंत्रालये 13 आणि 14 मार्च 2023 रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय परिसंवादासाठी एकत्र आली आहेत. यू20 आणि वाय20 प्राधान्याची क्षेत्रे यावर विचारमंथन करण्यासाठी आणि भविष्यातील तेजस्वी नेतृत्व तयार करण्यासाठी युवा मनांना एकत्र आणण्याचे काम हा कार्यक्रम करेल.

अर्बन 20 म्हणजे जागतिक पातळीवर परस्परांकडून शिकण्याची एक मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या अर्बन20 च्या प्रारंभिक बैठकीत सांगितले. शिकत राहण्याची ही महत्त्वाकांक्षा कायम राखण्यासाठी हा कार्यक्रम देशभरातील युवा वर्ग, राष्ट्रीय नेते, तज्ञ, विद्यार्थी, संशोधक आणि नवोन्मेषकर्ते यांना सध्याच्या काळात भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि आपली शहरे आणि समुदाय आपल्या रहिवासासाठी आणि समृद्धीसाठी एक चांगले स्थान कशा प्रकारे बनतील याविषयी परस्परांकडून शिकण्यासाठी एकत्र आणणार आहे.    

या परिसंवादात होणारे काही प्रमुख कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

  • प्रकाशन – एसएएआर कॉम्पेन्डियम 1.0 : देशातील प्रतिष्ठेच्या 15 महाविद्यालयांनी एसएएआर अर्थात स्मार्ट सिटीज अँड अकॅडमिक टूवर्डस ऍक्शन रिसर्च कार्यक्रमांतर्गत नवोन्मेषकारी शहरी प्रकल्पांसंदर्भातील 75+ प्रकरणांच्या अध्ययनातून तयार केलेला अहवाल आहे.
  • इतर प्रकाशने- या कार्यक्रमात प्रजातंत्र, इंडियन स्मार्ट सिटी फेलो कार्यक्रम, राष्ट्रीय अर्बन डिजिटल मिशन, अर्बन लर्निंग इंटर्नशिप कार्यक्रम आणि नॅशनल अर्बन लर्निग प्लॅटफार्म यांच्या विविध लेख, विविध प्रकल्पांचे अध्ययन आणि माहिती यांचे प्रकाशन होणार आहे.  
  • प्रकाशन- एसएएआर कार्यक्रम 2.0 : प्रत्येक स्मार्ट सिटीला किमान एका शिक्षण/संशोधन संस्थेसोबत संलग्न होण्यासाठी आणि किमान तीन प्रकल्प अध्ययन लेख तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. हे लेख नवोन्मेषी शहरी उपक्रमांची हुबेहुब आवृत्ती तयार करण्यासाठी संदर्भ दस्तावेज बनतील.
  • प्रदर्शन – एसएएआर अंतर्गत नवोन्मेषी शहरी प्रकल्प आणि एनएमसीजी( राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन) यावर या दोन दिवसीय कार्यक्रमात दोन प्रदर्शनांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. 

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906213) Visitor Counter : 150


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil