नौवहन मंत्रालय
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर जवाहरलाल नेहरू बंदर रुग्णालयाचे 100 खाटांच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात होणार रूपांतर
Posted On:
11 MAR 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2023
बंदराच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य सुविधा या वैद्यकीय पेशात विशेष अशाच असतात. बंदर, जहाजे आणि जहाजावरील लोकांच्या आरोग्य सेवेच्या विशिष्ट मागण्या असतात. हे लक्षात घेऊन बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने विद्यमान 50 खाटांचे जवाहरलाल नेहरू बंदर रुग्णालयाचे सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत 100 खाटांच्या मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यास मान्यता दिली आहे.
सध्याचे 50 खाटांच्या रुग्णालयात श्रेणीगत सुधारणा केली जाईल. दोन टप्प्यांत अंदाजे 48 कोटी रूपये खर्चाचा हा मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रकल्प निवडलेल्या बोलीदाराद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित केला जाईल. सर्बानंद सोनोवाल म्हणाले की“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नेहमीच म्हणतात की भारत एक असे राष्ट्र आहे जिथे उपचार ही सेवा आहे आणि निरोगीपणा हे दान आहे. मला विश्वास आहे की हे रुग्णालय बंदर कर्मचारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि उरण, रायगड जिल्ह्यातील रहिवाशांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यात मैलाचा दगड ठरेल.”
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1906004)
Visitor Counter : 132