संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय सागरी युद्धाभ्यास, कटलास एक्सप्रेस 2023 मध्ये  (IMX/CE-23) मध्ये आयएनएस त्रिकंडचा सहभाग

Posted On: 10 MAR 2023 6:38PM by PIB Mumbai

 

5 ते 9 मार्च 2023 दरम्यान आखातात आयोजित आंतरराष्ट्रीय सागरी युद्धाभ्यास, कटलास एक्सप्रेस 2023 (IMX/CE-23) च्या पहिल्या टप्यात भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस त्रिकंडने भाग घेतला. या कालावधीत, त्रिकंडने, सागरी सुरक्षा वाढवणे, सागरी मार्ग खुले ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा सुनिश्चित करणे या उद्देशाने बहारीन, जपानओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अऱब अमिराती, ब्रिटन आणि अमेरिका यांच्यासमवेत या युद्धाभ्यासात सहभाग नोंदवला.

आयएनएस त्रिकंड हे भारतीय नौदलाच्या पश्चिमी ताफ्याचा एक भाग आहे. मुंबई इथे मुख्यालय असलेल्या पश्चिमी नौदल कमानच्या हे अंतर्गत कार्यरत आहे. आयएनएस त्रिकंड एक आधुनिक युद्धनौका आहे. रडारला चकवा देण्याची या युद्धनौकेची क्षमता असून ती वेगवान आणि प्रगत तंत्रज्ञानाने युक्त आहे. लांब पल्ला गाठणे आणि अत्याधुनिक कॉम्बक्ट सूटसह, नौदलाच्या विस्तृत क्रियान्वयनासाठी या जहाजाचं आरेखन केलं आहे.

***

N.Chitale/S.Mohite/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1905696) Visitor Counter : 181


Read this release in: English , Urdu , Hindi