इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचा उद्यापासून तीन दिवसांचा बेंगळुरू दौरा
Posted On:
08 MAR 2023 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2023
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर 9 मार्चपासून बंगळुरू येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर असतील.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय -नॅस्कॉम उत्कृष्टता केंद्र (CoE) - माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे आयोजित डीप टेक समिट - ट्रान्सफॉर्मेशन थ्रू इंडिजिनस इनोव्हेशन अर्थात स्वदेशी नवोन्मेषाद्वारे परिवर्तन या डीप टेक परिषदेत मंत्री संबोधित करणार आहेत.
डीप टेक परिसंस्थेला उत्प्रेरित करण्यासाठी आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी भारत सरकारकडून घेतलेल्या धोरणात्मक उपक्रमांबद्दल राजीव चंद्रशेखर चर्चा करतील.
या कार्यक्रमात मंत्री हेल्थकेअर इनोव्हेशन चॅलेंज (एचआयसी) अर्थात आरोग्यसेवा नवोन्मेष आव्हाने या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या पुढील भागाचेही उद्घाटन करणार आहेत. एचआयसी च्या मागील भागांमध्ये देशभरातील आरोग्य प्रदात्यांद्वारे डिजिटल अवलंब करण्याचे अनेक लाभ अनुभवले आहेत.
बेंगळुरू येथील डीप टेक परिषदेत देशभरातील, विशेषतः कर्नाटकातील स्टार्टअप्सचाही सहभाग असेल.
नंतर, मंत्री लवकरच सादर होणार्या डिजिटल इंडिया विधेयकावर सल्लामसलत करतील - भविष्यासाठी सज्ज कायदा ज्याचा उद्देश विद्यमान माहिती तंत्रज्ञान कायद्याची जागा घेणे आणि भारताच्या तंत्रज्ञान युगासाठी एक मजबूत चौकट प्रदान करणे हा आहे. ही सल्लामसलत डिजिटल इंडिया संवादाचा एक भाग आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कायदा आणि धोरण निर्मितीसाठी सल्लागार दृष्टिकोन विकसित करण्याच्या पुढाकाराशी सुसंगत आहे.
हे प्रस्तावित विधेयक कोणत्या तत्त्वांवर आधारित असेल यावर उद्योग प्रतिनिधी, वकील, मध्यस्थ, ग्राहक गट यासह इतर भागधारकांशी राजीव चंद्रशेखर चर्चा करतील आणि त्यावर त्यांचे अभिप्राय मागवतील.
दुसऱ्या दिवशी, मंत्री बंगळुरूच्या आर.व्ही. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे 'न्यू इंडिया फॉर यंग इंडिया' या विषयावरील सत्राला संबोधित करतील आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, मंत्री महोदयांनी गेल्या 18 महिन्यांत देशभरातील 43 हून अधिक महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत ज्या दरम्यान त्यांनी नवीन भारतात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधी आणि नरेंद्र मोदी सरकारच्या भारताची तंत्रज्ञान युगाची प्रेरणा, संगणकीकरण आणि कौशल्यवृद्धीच्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.
राजीव चंद्रशेखर तंत्रज्ञान विकासाच्या विविध पैलूंशी संबंधित माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांशी संवादात्मक सत्र देखील घेतील.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905180)
Visitor Counter : 142