गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छोत्सव: केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते महिलांच्या नेतृत्वाखालील 3 आठवड्यांच्या स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन

Posted On: 07 MAR 2023 7:46PM by PIB Mumbai

 “गेल्या 75 वर्षांच्या योगदानाच्या तुलनेत 'नारी शक्ती'चे- माझ्या माता, भगिनी  आणि कन्या यांचे  पुढील 25 वर्षांतील भारताच्या वाटचालीतील योगदान अनेक पटींनी वाढलेले मी पाहू शकतो. या पैलूकडे आपण जितके अधिक लक्ष देऊ तितक्या अधिक संधी आणि सुविधा आपण या कन्यांना  देऊ शकतो. त्या बदल्यात त्या आपल्याला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक परत देतील. त्या देशाला एका नव्या उंचीवर नेतील.” – पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वातंत्र्य दिनाचे भाषण, 2022

महिला बदल घडवून आणण्यास मदत करू शकतात. त्या अनादी काळापासून केवळ त्यांच्या घरातच नव्हे, तर समाजात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेच्या भोक्त्या आहेत. 8 मार्च या  आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0.  अंतर्गत 3 आठवड्याच्या महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. स्वच्छतेत सहभागी असलेल्या महिला ते महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छता अशा संक्रमणाची जाणीव ठेवणे आणि हे संक्रमण साजरे करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. सर्व स्तरातील महिलांसाठी  विविध शहरांमध्ये कार्यक्रम आणि उपक्रमांची मालिका आयोजित केली जाणार आहे. कचरामुक्त शहरांचे (जीएफसी) मिशन यशस्वी करण्यासाठी  या महिला नेतृत्व करतील.

 या  वेळी, महिला आयकॉन्स लीडिंग सॅनिटेशन अँड वेस्ट मॅनेजमेंट (विन्स) चॅलेंज-2023 च्या पहिल्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली.. विन्स पुरस्कार-2023 साठी नामांकन 8 मार्चपासून सुरू होईल.

स्वच्छता यात्रा 10 मार्च रोजी सुरू होईल आणि 30 मार्च रोजी यात्रेचा समारोप होईल. 30 मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्र आमसभेने आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणून घोषित केला आहे. यात्रेचा भाग म्हणून 34 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी 24 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात जाणार आहेत.

30 मार्च रोजी काढण्यात येणारा स्वच्छ मशाल मार्च ‘महिला नेतृत्वाखालील स्वच्छतोत्सव’ या संकल्पनेला पूरक ठरेल. नागरी स्वराज्य संस्था प्रत्येक प्रभागातील सार्वजनिक ठिकाणे, मोकळे भूखंड, जलकुंभ, रेल्वे ट्रॅक, सार्वजनिक स्वच्छतागृहे या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवतील.

मोहिमेदरम्यान स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात 75,000 कचरामुक्त शहर प्रभावी योद्ध्यांचे, भागधारकांचे जाळे तयार केले जाईल. या महिला स्वच्छता योद्ध्यांना स्वच्छतेसाठी प्रशिक्षित केले जाईल. त्यामुळे  स्वच्छतेचे नेतृत्व मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे.

***

Nilima C/Parjna J/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904977) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi