राष्ट्रपती कार्यालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेला संदेश
Posted On:
07 MAR 2023 8:38PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 8 मार्च रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे:-
“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी सर्व नागरिकांचे, विशेषत: महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते.
आज महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आणि महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्या अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित करत आहेत. त्या जागृत असून अनेक क्षेत्रात नेतृत्वाची पदे भूषवत आहेत.
त्यांच्या संकल्पना, विचार आणि मूल्ये यामुळे सुखी कुटुंब, आदर्श समाज आणि समृद्ध राष्ट्र निर्माण होऊ शकते.
स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी अजूनही प्रयत्नांची गरज आहे. मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी राष्ट्र कटिबद्ध आहे शिक्षणामुळे त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होईल. आपल्या मुली केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवासाठी आणि देशातील महिलांना आनंदी भविष्यासाठी मी शुभेच्छा देते.”
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
***
Nilima C/Parjna/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1904971)