रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

येत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा एक भाग म्हणून, महिला सक्षमीकरणाचा प्रसार आणि कार्यक्रम साजरा करण्यासाठी रेल्वे मंडळाच्या वतीने “वॉकेथॉन” आयोजित

प्रविष्टि तिथि: 06 MAR 2023 4:39PM by PIB Mumbai

महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो.

 येत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून,महिला सक्षमीकरणाचा प्रसार आणि सोहळा साजरा करण्यासाठी रेल्वे मंडळाच्या वतीने  रेल्वे मंडळ आणि रेल्वे क्रीडा संवर्धन मंडळ यांनी आज म्हणजेच 6 मार्च 2023 रोजी रेल्वे भवन ते बोट क्लब ते पुन्हा  नवी दिल्ली अशी “वॉकेथॉन”  (पदयात्रा) आयोजित केली होती. या वॉकेथॉनमध्ये  नामवंत खेळाडू, आघाडीवर राहून काम करणाऱ्या महिला कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांसह भारतीय रेल्वेच्या 150 महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.रेल्वे मंडळाच्या वित्त विभागाच्या सदस्य अंजली गोयल   तसेच   परिचालन आणि व्यवसाय विभागाच्या सदस्य जया वर्मा सिन्हा  या  वॉकेथॉन  दरम्यान उपस्थित होत्या.

***

Nilima C/Sonal C/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1904682) आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी