ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
सोशल मीडियावरील सुप्रसिद्ध व्यक्ती, प्रभावशाली व्यक्ती, आभासी जगातील नामवंत अशा सर्वांसाठी केंद्र सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्वे
पैसे किंवा इतर काही मोबदल्याच्या स्वरूपात जाहिराती करणाऱ्यांसाठी जाहिरात विषयक शब्द कसे असावेत याबाबत केंद्राच्या स्पष्ट सूचना
जाहिरातींचा मजकूर सुस्पष्ट, ठळक आणि लोकांच्या सहज नजरेस पडेल असा असावा : ग्राहक व्यवहार मंत्रालय
Posted On:
06 MAR 2023 3:05PM by PIB Mumbai
सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींनी कायम आपण करत असलेल्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती आणि त्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेतलेला असावा, जेणेकरून जाहिरातीत त्या उत्पादनाविषयी केले जाणारे दावे खरे आहेत,याची सत्यता त्यांना पडताळून बघता येईल. तसेच ही उत्पादने किंवा सेवा, या व्यक्तींनी स्वतः वापरुन बघाव्यात, अशा सूचनाही या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आल्या आहेत.
शेवटी, अशा जाहिरातींमधून कोणतीही उत्पादने किंवा सेवांची भलामण करतांना ग्राहकांची आणि आपल्या प्रेक्षकांची त्यांनी दिशाभूल करु नये,त्या नियम कायद्यावर आधारित असाव्यात असा या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश आहे. सर्व सेलिब्रिटी, प्रभावशाली व्यक्तींना ह्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत, आपल्या प्रेक्षक वर्गासमोर पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक असेल.
***
Nilima C/Radhika A/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904629)
Visitor Counter : 221