महिला आणि बालविकास मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, राष्ट्रीय महिला आयोगाने ‘महिला सक्षमीकरणात प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन विश्वाची भूमिका या विषयावरील चर्चासत्राचे केले आयोजन
प्रविष्टि तिथि:
04 MAR 2023 2:02PM by PIB Mumbai
येत्या आठ मार्चला असलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने, राष्ट्रीय महिला आयोगाने, नेटफ्लिक्सच्या सहकार्याने ‘महिला सक्षमीकरणात प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगांची भूमिका’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन केले होते.
यावेळी झालेल्या दोन चर्चासत्रांमध्ये, उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, स्वयंसेवी संस्था, महिला कलाकार आणि दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रातल्या नामवंत महिला सहभागी झाल्या होत्या. महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेला आकार देण्यासाठी, कथा सांगण्याचा दृष्टिकोन कशाप्रकारे भूमिका पार पाडू शकतो, यावर सगळ्यांनी आपापली मते मांडली.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यावेळी म्हणाल्या की, “सिनेमा हे समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे एक महत्वाचे साधन ठरू शकते, मात्र जोपर्यंत आपण महिलांचे आवाज ऐकत नाही, आणि त्यांच्या कथा त्यातून मांडत नाही, तोपर्यंत, या माध्यमाचा आपण पुरेपूर उपयोग करु शकत नाही. चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्व क्षेत्रात, म्हणजे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय यात महिलांचा सहभाग इतर महिलांना केवळ प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा नसतो, तर त्यातून प्रत्येकासाठी, एका न्याय्य आणि सर्वसमावेशक भविष्याची वाटचालही सुकर होऊ शकते. राष्ट्रीय महिला आयोग आणि नेटफ्लिक्स यांच्या सहकार्यातून आमचा उद्देश, सिनेमाक्षेत्रातल्या महिलांमधील सुप्त क्षमता अधोरेखित करत, त्या सिनेमातून मांडणे हा आहे, जेणेकरुन, भविष्यातील पिढ्यांना देखील त्यांचा आवाज ऐकता येईल, त्यांचे अनुभव जाणून घेता येतील आणि त्यांनी मिळवलेल्या यशातून पुढची पिढी प्रेरणाही घेऊ शकेल”
नेटफ्लिक्स इंडियाच्या मालिका प्रमुख तान्या बामी यांनी महिलांना पुढे जाण्यासाठी कथा-कथनाच्या भूमिकेवर भाष्य केले.
दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात महिला सक्षमीकरणात माध्यमे आणि मनोरंजनाची भूमिका या विषयावरील चर्चासत्राने झाली.
तर दुसऱ्या चर्चासत्रात, 'तिची कथा, तिचा आवाज: मीडियामधील महिलांसोबत संभाषण' या विषयावर बोलतांना, मनोरंजन आणि प्रसारमाध्यम व्यवस्थेतील महिलांनी आपले अनुभव यावेळी मांडले.
***
U.Ujgare/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1904157)
आगंतुक पटल : 218