वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग मंत्रालयाची “समर्थ” योजना (वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता वाढवण्यासाठी योजना) मार्च २०२४ पर्यंत कार्यान्वित
85% पेक्षा अधिक महिला लाभार्थी, बहुसंख्य महिला समाजातील उपेक्षित वर्गातील
वस्त्रोद्योग कंपन्यांच्या समन्वयासह रोजगार दुवा या योजनेचे उद्दिष्ट
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2023 10:22PM by PIB Mumbai
'समर्थ' योजना , ही वस्त्रोद्योग मंत्रालयाचा मागणीवर आधारित आणि नोकरीभिमुख एकछत्री कौशल्य कार्यक्रम आहे. योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी मार्च 2024 पर्यंत आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे स्वीकारलेल्या व्यापक कौशल्य धोरण आराखड्यांतर्गत ही योजना तयार करण्यात आली आहे.
ही योजना कापड उद्योग/उद्योग संघटना, राज्य सरकारी संस्था आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विभागीय संस्था जसे हातमाग विकास आयुक्त कार्यालय, हस्तकला विकास आयुक्त कार्यालय आणि रेशीम मंडळ यांसारख्या कार्यान्वयन भागीदारांद्वारे राबविण्यात येते.
याशिवाय, या योजनेअंतर्गत राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यासह (एनएसक्यूएफ) सह संरेखित एकूण 184 अभ्यासक्रम विविध वस्त्रोद्योग क्षेत्र, ज्यात हातमाग/हस्तकलासारखे पारंपारिक क्षेत्र आणि रूढ वस्त्र परिधानापासून तांत्रिक वस्त्रोद्योगासारखे सारखे प्रगत क्षेत्र समाविष्ट आहे.
संघटित वस्त्रोद्योग क्षेत्रांतर्गत अभ्यासक्रमांमध्ये रोजगार दुवा अनिवार्य आहे. त्यानुसार प्रवेश स्तरावर 70% आणि उच्च कौशल्य अभ्यासक्रमांसाठी 90% प्लेसमेंट अनिवार्य आहे. आतापर्यंत वाटप केलेल्या 3.47 लाख लाभार्थ्यांच्या कौशल्य उद्दिष्टापैकी 1.5 लाख लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत प्रशिक्षित लाभार्थ्यांपैकी 85% पेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत. संघटित क्षेत्रातील अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षित लाभार्थ्यांपैकी 70% पेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्लेसमेंट प्रदान करण्यात आली आहे.
कार्यान्वयन भागीदारांचे पॅनल व्यापक असावे यासाठी मंत्रालयाने वस्त्रोद्योग आणि वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित उद्योग संघटनांकडून पॅनलमध्ये सहभागी होण्यासंदर्भात प्रस्ताव मागवले आहेत. अर्ज सादर करण्याचे पोर्टल 14.03.2023 पर्यंत खुले आहे.
या उद्देशाने आणलेल्या विनंतीपत्राचे (आरएफपी) तपशील खालील लिंक्सद्वारे ऍक्सेस केले जाऊ शकतात:
वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संकेतस्थळ :- https://www.texmin.nic.in/coming-tender
समर्थ संकेतस्थळ : https://samarth-textiles.gov.in
***
S.Bedekar/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1904093)
आगंतुक पटल : 428