राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इटलीच्या पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

प्रविष्टि तिथि: 02 MAR 2023 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2023  

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आज (2 मार्च 2023) राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या इटलीच्या पंतप्रधानांचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एका तरुण आणि आत्मविश्वासी महिलेला इटलीचे नेतृत्व करताना पाहून त्यांना आनंद झाला. मेलोनी या केवळ इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान नाहीत तर त्यांच्या देशाच्या सर्वात तरुण पंतप्रधान देखील आहेत असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत आणि इटलीमध्ये उत्तम मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आधुनिक आणि परिपक्व लोकशाही म्हणून, भारत आणि इटली कायद्याचे राज्य, मानवी हक्कांचा आदर आणि सर्वसमावेशक विकासावर आधारित आर्थिक विकास साधण्यासाठी वचनबद्ध आहेत. या भेटीमुळे भारत-इटली द्विपक्षीय संबंध पुन्हा बळकट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, इटली हा भारताच्या प्रमुख आर्थिक भागीदारांपैकी एक आहे. स्वच्छ ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील भागीदारी चांगली प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले. इटालियन कंपन्यांना भारतातील संधींचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले.

जी-20 च्या भारताच्या अध्यक्षतेखाली आणि जी-7 च्या इटलीच्या आगामी अध्यक्षतेखाली, आरोग्यसेवा, हवामान बदल आणि डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रात भारत आणि इटलीमध्ये एकत्र काम करण्याची क्षमता आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले.

S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1903775) आगंतुक पटल : 308
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu