अर्थ मंत्रालय

मुंबई सीमाशुल्क विभागाकडून नवी मुंबईतील तळोजा येथे 61.586 किलो अंमली पदार्थ आणि ‘सायकोट्रॉपिक’ पदार्थांची विल्हेवाट

Posted On: 02 MAR 2023 7:32PM by PIB Mumbai

मुंबई, 2 मार्च 2023

डीआरआय, एनसीबी, मुंबई सीमाशुल्क विभाग आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या सीबीआयसी च्या उच्चस्तरीय अंमली पदार्थ नष्ट करणाऱ्या समितीने आज (2 मार्च 2023) हेरॉइन, कोकेन, एमडीएम, गांजा, ट्रामडॉल, अल्प्राझोलम, जेपीडिओल, रडोल, झोलफ्रेश आणि डिझी-डिझेपाम टॅब्लेट इत्यादि 61.586 किलो नार्कोटिक्स अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे (सायकोट्रॉपिक) घटक (NDPS) महाराष्ट्रातील नवी मुंबईमधील तळोजा येथील  सामान्य घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधेद्वारे (CHWTSDF), MWML, जाळून सुरक्षितपणे विल्हेवाट लावली.

बेकायदेशीर एनडीपीएस माल रोखण्यात आणि मुंबई सीमाशुल्क परिक्षेत्र -1 च्या अखत्यारीत त्यांची वेळेवर विल्हेवाट लावण्यात विविध सीमाशुल्क विभागाच्या एजन्सींच्या सक्रिय भूमिकेमुळे, अंदाजे 250 कोटी रुपये (बेकायदेशीर बाजारपेठेतील त्यांच्या किंमतीनुसार) विविध बेकायदेशीर उपक्रमात वळण्यापासून रोखण्यात आले.

या यशस्वी विल्हेवाटीचा उद्देश अमली पदार्थांच्या तस्करीच्या घातक परिणामांपासून समाजाचे रक्षण करणे आणि बळकट अंमलबजावणी उपायांचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.


S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1903736) Visitor Counter : 130


Read this release in: English