विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे आयोजित कार्यक्रमात, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी परदेशस्थ भारतीयांसाठी ‘वैभव’ या अभ्यासवृत्तीची केली घोषणा

Posted On: 28 FEB 2023 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2023

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी एका कार्यक्रमात, परदेशातील भारतीय समुदायासाठी, ‘वैभव’ या अभ्यासवृत्तीचा शुभारंभ केला.

यावेळी, विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की वैभव ह्या अभ्यासवृत्तीचा उद्देश, भारतातील उच्चशिक्षण संस्थांमधील संशोधनाच्या वातावरणात सुधारणा करणे हा आहे. त्यासाठी, भारतीय शिक्षण संस्था आणि जगातील सर्वोत्तम शिक्षणसंस्था, यांच्यात अध्ययन आणि संशोधनासाठी सहकार्य करत, त्याद्वारे परदेशातील व्याख्याते/संशोधक यांना भारतीय संस्थांमध्ये आणले जात आहे. परदेशस्थ भारतीय समुदायातील बुद्धिमान विद्यार्थी आणि भारतातील विद्यार्थी यामुळे एकत्र येऊन, जागतिकदृष्ट्या उच्च दर्जाचे प्रकल्प आणि उत्पादने निर्माण करतील, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाच्या बीज भाषणात, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की मे 2014 पासून, म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच अंतराळ, अणुऊर्जा आणि पृथ्वीविज्ञान मंत्रालयासाठीची उद्दिष्टे आणि प्राधान्ये यात दृश्य स्वरूपाचे बदल केले आहेत. भारतात गुणवत्ता आणि क्षमतांची कधीच वानवा नव्हती, मात्र  2014 नंतर राजकीय इच्छाशक्तीमुळे जे धोरणात्मक बदल झाले, त्यामुळे फरक पडला आहे, असे जितेंद्र सिंह पुढे म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह पुढे म्हणाले, “2015 पर्यंत जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या क्रमवारीत, 130 देशांमध्ये भारत 81 व्या क्रमांकावर होता, मात्र 2022 मध्ये भारताने यात 40 व्या स्थानी झेप घेतली. आज पीएचडी धारकांच्या बाबतीत, जगात भारत पहिल्या तीन देशांमध्ये आहे, तर  स्टार्ट अप व्यवस्थेच्या बाबतीतही जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.”

जितेंद्र सिंह असेही म्हणाले की, गेल्या 9 वर्षात देशाने एकूण प्रकाशनात, (राष्ट्रीय विज्ञान फौंडेशनच्या डेटाबेसनुसार  जागतिक पातळीवर भारताचा आता तिसरा क्रमांक आहे, जो 2013 मध्ये सहावा होता.), पेटंट (जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर) आणि संशोधन प्रबंध प्रकाशनाची गुणवत्ता (जागतिक क्रमवारीत 9 वा क्रमांक, जो 2013 मध्ये 13 होता).

भारताची वैज्ञानिक ताकद, अमृत काळाच्या पुढील 25 वर्षात देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेची दिशा आणि प्रगती निश्चित करेल, असे त्यांनी सांगितले.

 


N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1903213) Visitor Counter : 148


Read this release in: English , Hindi , Telugu