ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रकटन यथार्थ असावे आणि हॅशटॅग किंवा लिंक्सच्या गटामध्ये सरमिसळ नसावी: केंद्र सरकार


जाहिरातींमध्ये नैतिक मानकांची आवश्यकता आणि जबाबदार जाहिरात पद्धत आणि ग्राहक संरक्षणाचे महत्व: ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव

Posted On: 27 FEB 2023 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2023

 

प्रकटन यथार्थ असावे आणि हॅशटॅग किंवा लिंक्सच्या गटामध्ये त्याची सरमिसळ नसावी असे भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव, रोहित कुमार सिंह यांनी भारतीय जाहिरात मानक परिषदेने (एएससीआय) आज मुंबईत आयोजित केलेल्या #GetItRight ब्रँड इन्फ्लुएंसर समिट 2023 मध्ये आभासी माध्यमातून बीजभाषण करताना सांगितले. या शिखर परिषदेत जबाबदार जाहिरात पद्धती आणि ग्राहक संरक्षणाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

सचिवांनी पुढे सांगितले की, एखाद्या जाहिरातीतील कोणत्याही वस्तूच्या समर्थनासाठी, त्यासंदर्भातील सर्व खुलासे स्पष्ट निर्देशित केले जावे आणि व्हिडिओंमधील समर्थनांसाठी, प्रकटीकरण दृक-श्राव्य अशा दोन्ही स्वरूपात केले जावे. लाइव्ह स्ट्रीममध्ये, प्रकटन सातत्याने प्रदर्शित केले जावे आणि ठळक असावे.

उत्पादक, सेवा पुरवठादार, जाहिरातदार आणि जाहिरात एजन्सींनी त्यांच्या जाहिरातींमुळे ग्राहकांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेण्यावर त्यांनी भर दिला. मुख्य भाषणात जबाबदार जाहिरात पद्धत आणि ग्राहक संरक्षणाच्या महत्त्वाबद्दल मौल्यवान दृष्टिकोन त्यांनी  मांडला.

व्यवसायांना पाठिंबा देणे आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे यामधील समतोल राखण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर सिंह यांनी प्रकाश टाकला. दोघांनी बरोबरीने  वाटचाल करावी या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामायिक केलेल्या भावनेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

त्यांनी भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ग्राहक संरक्षण कायदा 2019 चा उल्लेख केला, जो दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून संरक्षण प्रदान करतो. सिंग यांनी चांगल्या आणि वाईट जाहिरातींमधील फरक विशद केला आणि सांगितले की सरकारचा हेतू व्यवसायांच्या वाढीस अडथळा आणण्याचा नसून नैतिक मानकांची पूर्तता सुनिश्चित करणे हा आहे.

भारतात 75 कोटींहून अधिक इंटरनेट वापरकर्ते, त्यापैकी 50 कोटी सोशल मीडिया वापरकर्ते आहेत. हे लक्षात घेऊन सिंग यांनी पारंपरिक जाहिराती ते सोशल मीडिया जाहिराती यातील आमूलाग्र बदल आणि ते जबाबदारीने करण्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रभावशाली आणि प्रसिद्ध व्यक्तींनी जाहिरातदारांशी कोणतेही लाभकारी संबंध उघड करण्याच्या गरजेवर भर दिला ज्यामुळे त्यांच्या प्रतिनिधीत्वाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902878) Visitor Counter : 128


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi