संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या ऑल-वुमेन कार रॅलीचा नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार यांच्या उपस्थितीत समारोप
#SHEsUNSOPPABLE #SOARHIGH
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2023 9:56PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी आणि नेव्ही वेलनेस अँड वेलफेअर असोसिएशन (NWWA) च्या सदस्यांचा समावेश असलेल्या, ऑल-वुमेन कार रॅलीचा आज, 25 फेब्रुवारी 23 रोजी, नौदल प्रमुख (CNS) अॅडमिरल आर हरी कुमार आणि नेव्ही वेलनेस अँड वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्ष कला हरी कुमार यांच्या उपस्थितीत समारोप झाला. राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवून, ‘अमृत काळाचा’ दृष्टीकोन साकार करण्यामध्ये असलेले नारी शक्तीचे महत्वाचे योगदान अधोरेखित करण्यासाठी, तसेच वुमेन ईन व्हाईट, अर्थात, भारतीय नौदलामधील महिला अधिकाऱ्यांबद्दल जागृती वाढवण्यासाठी, भारतीय नौदल आणि नेव्ही वेलनेस अँड वेलफेअर असोसिएशनने, मेसर्स जीप इंडियाच्या सहयोगाने, देशातील आणि भारतीय नौदलामधील शूर महिलांना मानवंदना देण्यासाठी ऑल-वुमेन कार रॅली आयोजित केली होती.
नौदल प्रमुखांनी आपल्या भाषणात सहभागींनी केवळ 2300 किमी अंतराचा संस्मरणीय प्रवास पूर्ण केल्याबद्दलच नव्हे, तर आपल्या आउट-रिच कार्यक्रमा द्वारे अनेकांच्या जीवनाला आणि मनाला स्पर्श केल्याबद्दल अभिनंदन केले. खासगी आणि सरकारी शाळांमधील युवा मुलींबरोबर त्यांनी साधलेल्या संवादामुळे, या मुलींना भारतीय नौदल आणि सशस्त्र दलात सामील होण्यासह आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "आजची एक छोटीशी ठिणगी, उद्याची मोठी झेप घेण्याचा मार्ग मोकळा करेल," ते म्हणाले.
‘शी इज अनस्टॉपेबल’ आणि ‘सोअर हाय’ या घोषवाक्यासह, ऑल-वुमेन कार रॅली, 14 फेब्रुवारी 23 रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारक, नवी दिल्ली इथून सुरू झाली आणि 19 फेब्रुवारी 23 रोजी वॉर मेमोरियल, लोंगेवाल (राजस्थान) इथे पोहोचली. 12 दिवसांमध्ये 2300 किमी प्रवास करून 25 फेब्रुवारी 23 रोजी या रॅलीचा समारोप झाला.


***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902430)
आगंतुक पटल : 158