कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
‘सचिवालय सुधारणा’ अहवालाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली
Posted On:
23 FEB 2023 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2023
23.12.2022 रोजी राष्ट्रीय कार्यशाळेत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाने (DARPG) जानेवारी 2023 साठी "सचिवालय सुधारणा" वरील मासिक अहवाल प्रकाशित केला. हा अहवाल https://darpg.gov.in/sites/default/files/SECRETARIAT_REFORMS.pdf. वर उपलब्ध आहे.
जानेवारी 2023 महिन्याच्या अहवालातील प्रमुख ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
1. स्वच्छता मोहीम आणि प्रलंबितता कमी करणे
a.2,52,480 फाइल्सचे पुनरावलोकन करण्यात आले. 1,79,175 फायलींपैकी 1,63,664 फाईल्सची छाटणी करण्यात आली.
b.प्राप्त झालेल्या 4,40,671 पैकी 3,94,805 सार्वजनिक तक्रारी निकाली काढण्यात आल्या. (निपटारा दर- 89.59%)
c.जानेवारी 2023 मध्ये 10,45,939 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली.
d.जानेवारी 2023 मध्ये भंगाराची विल्हेवाट लावून 17,49,91,167/- रुपये महसूल कमावण्यात आला.
e.4,711 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
2. निर्णय घेण्याची कार्यक्षमता वाढवणे
a.64 मंत्रालये/ विभागांनी डीलेयरिंग प्रणाली लागू केली (42 पूर्णपणे डीलेयर तर 22 अंशतः डीलेयर करण्यात आले)
b.69 मंत्रालये/ विभागांनी शिष्टमंडळ कार्यान्वित केले.
c.28 मंत्रालये/विभागांमध्ये डेस्क ऑफिसर प्रणाली कार्यरत झाली.
3. ई-ऑफिस अंमलबजावणी आणि विश्लेषण
a.ई-ऑफिस आवृत्ती 7.0 वर 72 मंत्रालये/ विभाग स्थलांतरित झाले.
b.8,94,329 प्रत्यक्ष सक्रिय फायलींपैकी 31,60,392 ई-फायली सक्रिय.
c.31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या महिन्यात 28,17,775 सक्रिय ई-फाईल्सच्या तुलनेत 31 जानेवारी 2023 रोजी संपलेल्या महिन्यात सक्रिय ई-फाईल्स 31,60,392 पर्यंत वाढल्या आहेत.
d.10 मंत्रालये/ विभागांकडे जानेवारी 2023 मध्ये 100% ई-पावत्या जारी करण्यात आल्या.
4. सर्वोत्तम पद्धती
a.कामगार आणि रोजगार मंत्रालय: भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) गोरखपूरने कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली.
b.कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग: कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे शालेय मुलांसाठी स्वच्छतेचे महत्त्व आणि शेतातील कचऱ्याचे संपत्तीमध्ये रूपांतर या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
c.रेल्वे मंत्रालय: विजयवाडा रेल्वे स्थानकाने कचऱ्याच्या उगमस्थानीच कचऱ्याचे वर्गीकरण केले.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901834)
Visitor Counter : 193