वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (NPG)ची 43 वी बैठक


नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने महत्त्वाच्या 3 रेल्वे प्रकल्पांचे परीक्षण करून शिफारस केली

Posted On: 17 FEB 2023 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी  2023

 

पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याच्या संस्थात्मक आराखड्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने 3 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचे परीक्षण करून शिफारस केली आहे.

उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग (DPIIT) च्या विशेष सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये रेल्वे मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, दूरसंचार विभाग, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, कार्पोरेट व्यवहार मंत्रालय यासारख्या पायाभूत सुविधा मंत्रालयांच्या नियोजन विभागांचे प्रमुख तसेच नीती आयोग आणि पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालयाचे विशेष प्रतिनिधी उपस्थित होते.

औरंगाबाद आणि अंकाई स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण:

नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने महाराष्ट्रातील  औरंगाबाद ते अंकाई दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाशी संबंधित प्रकल्पाचे परीक्षण केले. यामुळे बंगळुरू, हैदराबाद, निजामाबाद या ठिकाणांहून  मुंबई, नवी दिल्ली, अमृतसर या लांबच्या स्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

प्रस्तावित प्रकल्पाच्या वाढीमुळे विभाग क्षमतेत 114% वरून 143% पर्यंत वाढ होईल आणि या एकेरी मार्गावरील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुधारेल. हे दुहेरीकरण अरवली दक्षिण संपर्क कॉरिडॉर मध्ये येत असल्याने जवळपासच्या औद्योगिक क्षेत्रामधून संभाव्य मालवाहतूकची पूर्तता करू शकते. एकूण 98 लाख लोकसंख्येची 38 गावे आणि दौलताबाद, औरंगाबाद आणि जालना या औद्योगिक क्षेत्रांना जोडत हा मार्ग प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हींसाठी एक आदर्श मिश्रण प्रदान करेल.

भद्रक-विझियानगरम दरम्यान शिल्लक विभागातील तिसरा मार्ग  :

भारताच्या पश्चिम  आणि दक्षिण किनार्‍यादरम्यान मालवाहतूक सुधारण्यासाठी, नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने ओडिशा आणि आंध्र प्रदेश राज्यांमधील भद्रक आणि विझियानगरममधील उर्वरित विभागात 3 रा मार्ग  जोडण्याच्या प्रकल्पाचे परीक्षण केले.

सोनानगर - आंदल 3रा  आणि 4था  रेल्वेमार्ग :'

सुधारित वॅगन टर्नअराउंड वेळ आणि प्रवासी गाड्यांची योग्य वक्तशीरता सुनिश्चित करण्यासाठी, नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये येणाऱ्या सोननगर - आंदल मार्गावर 3ऱ्या आणि 4 त्या  रेल्वे मार्ग  प्रकल्पाचे मूल्यांकन केले.

विशेष सचिवांनी या अति प्रभावी प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले. कारण हे प्रकल्प या प्रदेशातील बंदर संपर्कासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या सर्व 3 प्रकल्पांचे नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपद्वारे मूल्यमापन करण्यात आले आणि शेवटच्या मैलापर्यंत संपर्क स्थापित करण्यासाठी आणि योग्य मल्टीमोडल लॉजिस्टिकसाठी काही सूचना देत अंमलबजावणीसाठी शिफारस करण्यात आली.

 

 

 

 

 

 

S.Kulkarni/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900265) Visitor Counter : 209


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu