आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते भारतातील रुग्ण सुरक्षेला गती देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
"भारताने नेहमीच रुग्णांच्या सुरक्षिततेचे महत्त्व ओळखले आहे आणि सार्वजनिक आरोग्य बाब मानून ती सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे"
दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी रुग्णांची काळजी ही अत्यावश्यक गोष्ट : डॉ. भारती प्रवीण पवार
"ग्लोबल पेशंट सेफ्टी ॲक्शन प्लॅन 2021-2030’’वर स्वाक्षरी करणारा भारत अग्रगण्य देशांपैकी एक होता"
Posted On:
16 FEB 2023 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी, 2023
“भारताने नेहमीच रुग्णांच्या सुरक्षिततेचे महत्त्व ओळखले आहे आणि सार्वजनिक आरोग्य बाब म्हणून त्याला प्राधान्य दिले आहे. ” असे प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने भारतात रुग्ण सुरक्षेला गती देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला मार्गदर्शन करताना केले. कार्यशाळेमध्ये राज्ये आणि विविध भागधारक विभागांना राष्ट्रीय रुग्ण सुरक्षा अंमलबजावणी आराखडा , तसेच रुग्णांच्या सुरक्षेसाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांची क्षमता वाढवणे आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी त्रैमासिक राज्य कृती योजना विकसित करण्यासाठी चौकट तयार करण्यासाठी त्यांच्या भूमिकेबद्दल संवेदनशील बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
डॉ. पवार यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल सर्व भागधारकांचे अभिनंदन केले आणि नमूद केले की, 2002 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य महासभेच्या ठरावावर सहमती दर्शवली आणि ‘ जागतिक रुग्ण सुरक्षा कृती योजना 2021-2030 ‘ वर स्वाक्षरी करणारा भारत हा अग्रगण्य देश होता.
रुग्णांची सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विविध रणनीती आणि कार्यक्रमांचा समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय रुग्ण सुरक्षा अंमलबजावणी आराखडा (एनपीएसआयएफ) 2018 मध्ये लागू करण्यात आला आहे.
राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावर भर दिला की, दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी रुग्णांची सुरक्षा ही अत्यावश्यक बाब आहे आणि आपल्या राष्ट्राने हाती घेतलेले उपक्रम आणि नवकल्पनांनी त्या दिशेने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना डॉ. पवार म्हणाले की, “भारताने महत्त्वाच्या अडथळ्यांना आणि धोक्यांना तोंड देत, देशाच्या सर्वात दूर आणि दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या कार्यात अभूतपूर्व प्रगती केली आहे”.
S.Kulkarni/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899992)
Visitor Counter : 172