विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर-एचआरडीसी’ च्यावतीने 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी कार्यशाळाचे आयोजन

Posted On: 16 FEB 2023 9:51PM by PIB Mumbai
पणजी, 16 फेब्रुवारी, 2023
 
सीएसआयआर म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्‍या मनुष्‍यबळ विकास केंद्रच्यावतीने 16-17 फेब्रुवारी, 2023 रोजी सर्व ‘नोडल’अधिका-यांची सीएसआायआर एकात्मिक कौशल्य उपक्रमासाठी "समन्वयकांची परिषद तसेच कार्यशाळेचे आयोजन इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) आणि सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, दोना पावला, येथे केले आहे. सीएसआयआर शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी), सेक्टर स्किल कौन्सिल (एसएससी), गोवा राज्य सरकार आणि इतर भागधारकांसह 80 हून अधिक व्यक्ती या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत.
 
सीएसआयआरचे ज्ञानाधिष्ठित संशोधन आणि विकास तसेच उपलब्ध संसाधने एकाच छताखाली आणण्यासाठी, आणि या सामुग्रीचा देशाच्या कौशल्य विकासासाठी प्रभावी वापर केला जाऊ शकतो. यासाठी सीएसआयआर ने 2016 मध्ये " सीएसआयआर एकात्मिक कौशल्य उपक्रम " राष्ट्रीय-स्तरीय सुरू केला आहे.
 
सीएसआयआर प्रयोगशाळांबरोबर जोडले गेले तर युवकांना आवश्यक तांत्रिक कौशल्यांनी सुसज्ज करणे शक्य होणार आहे. तसेच प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रचंड वापरामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक गरजा पूर्ण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
 
सीएसआयआर प्रयोगशाळांच्या संपर्कात येवून तरुण मनांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये सुसज्ज करणे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रचंड वापरामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अंतराच्या गंभीर गरजा पूर्ण करणे हा या उपक्रमाचा मुख्य फोकस आहे.
 
या उपक्रमाचा लाभ विविध स्तरातील मंडळी घेत आहेत. अगदी शाळा सोडलेल्या व्व्यक्तीपासून ते शेतकरी बंधूपर्यंत तसेच आयटीआय पदविकाधारकापासून ते पदवीधर आणि डॉक्टरेटपर्यंत लाभार्थी आहेत. ग्रामीण नागरिक आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रमांसह या उपक्रमांतर्गत सीएसआयआर ने आत्तापर्यंत 1.00 लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. जैविक, रासायनिक, अभियांत्रिकी आणि भौतिक विज्ञान अशा विस्तृत वैज्ञानिक क्षेत्रांचा यामध्‍ये समावेश आहे. फेज-दोन (2020-2025) मध्ये या कार्यक्रमांतर्गत 100000 हून अधिक कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्याचे सीएसआयआरचे लक्ष्य आहे.
 
परिषद – सीएसआयआर मनुष्‍यबळ विकास केंद्र , गाझियाबाद (उत्तर प्रदेश ), सीएसआयआरचा प्रशिक्षण विभागाच्या वेळोवेळी घेतलेल्या पुढाकाराने कामगिरीचे पुनरावलोकन, निरीक्षण आणि मूल्यमापन करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
 
S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 


(Release ID: 1899985) Visitor Counter : 115


Read this release in: English