श्रम आणि रोजगार मंत्रालय
कामगार ब्युरोने हाती घेतले अखिल भारतीय स्तरावरील घरगुती कामगारांचे सर्वेक्षण
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2023 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कामगार ब्युरो, या संलग्न कार्यालयाने, महाराष्ट्रासह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक कुटुंबांकडून माहिती संकलित करून अखिल भारतीय स्तरावरील घरगुती कामगारांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे, अशी माहिती कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
घरगुती आणि स्थलांतरित कामगारांचे अखिल भारतीय स्तरावरील सर्वेक्षण बहु-स्तरीय नमुना आराखड्यावर आधारित असून त्यासाठी काही निवडक कुटुंबे निवडून हे सर्वेक्षण केले गेले आहे, घरगुती कामगारांवरील अखिल भारतीय स्तरावरील सर्वेक्षणाचे क्षेत्रीय कार्य अंतिम टप्प्यात आहे आणि प्रतिसाद देणार्या कुटुंबांची ओळख कधीही उघड केली जात नाही तसेच केवळ आकडेवारी एकत्र करून त्यावर आधारित निकाल जाहीर केले जातात असे या लेखी उत्तरात म्हटले आहे.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898917)
आगंतुक पटल : 269