संरक्षण मंत्रालय
AK- 203 ॲसॉल्ट रायफलची निर्मिती
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2023 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
इंडो रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL)या जॉईंट व्हेंचर म्हणजे संयुक्त उपक्रमातून स्वदेशी AK-203 रायफल्सची निर्मिती होणार आहे.
स्वदेशात निर्माण होणाऱ्या या ॲसॉल्ट रायफलच्या उत्पादनासाठी इंडो रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडने उत्तर प्रदेशातील कोरवा येथे सर्व सुविधा स्थापित केल्या आहेत. सध्या या रायफल्स उत्पादनाच्या आणि परीक्षणाच्या टप्प्यात आहेत.
AK-203 रायफल्सचे स्वदेशी उत्पादन हे भारतीय संरक्षण दलांना स्वनिर्भरतेकडे नेणारे आहे, हेच आत्मनिर्भर भारतचे उद्दिष्ट आहे.
आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी ही माहिती दिली.
N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898885)
आगंतुक पटल : 368