इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली पहिली डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठक उद्यापासून लखनौ इथे  सुरू होणार


या तीन दिवसीय कार्यक्रमात जी 20 देश, 9 आमंत्रित देश आणि 5 आंतरराष्ट्रीय संघटना होणार सहभागी

Posted On: 12 FEB 2023 9:45PM by PIB Mumbai

 

भारताच्या जी 20  अध्यक्षतेचा एक भाग म्हणून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील लखनौ येथे 13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान  पहिली डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीचे आयोजन केले आहे. डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट जो  आधी डिजिटल अर्थव्यवस्था कृती गट म्हणून ओळखला जात होता , या गटाची स्थापना 2017 मध्ये जर्मनीच्या जी 20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून एक सुरक्षित, परस्परांशी जोडलेली आणि सर्वसमावेशक अशा डिजिटल अर्थव्यवस्थेच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने  करण्यात आली. जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेचे मूल्य  11 ट्रिलियन डॉलर्स असेल असा अंदाज आहे आणि 2025 पर्यंत ते 23 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता  आहे. डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट डिजिटल क्षेत्रात जागतिक धोरणाला  आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

जी 20 सदस्यांव्यतिरिक्त, भारताने अतिथी देशांना (बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड्स, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिराती), आणि आंतरराष्ट्रीय संघटना  (आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना, ओईसीडी, जागतिक बँक, युनेस्को , आणि यूएनडीपी ) डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

लखनौमधील पहिल्या  डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट  बैठकीच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अनेक द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि अनेक उपक्रम सुरू केले , यामध्ये पुढील उपक्रमांचा  समावेश आहे:

"स्टे सेफ ऑनलाइन" मोहीम: जी 20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स (G20-DIA):

"डिजिटल पेमेंट" मोहीम: इमर्सिव्ह डिजिटल मोबाईल व्हॅन: 

तीन दिवस चालणारी डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट  बैठक उद्यापासून सुरु होईल ज्यात अनेक औत्सुक्यपूर्ण   कार्यशाळा, चर्चा आणि अनुभवांचे आदानप्रदान होईल, तसेच एकूणच  डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट  अजेंडाला पूरक संकल्पनेवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमांचे  थेट प्रसारण https://youtube.com/live/Ck6YC0_LmhY  वर केले जाईल.

याशिवायअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल इंडियाने भारतातील अब्जावधी लोकसंख्येचे जीवन कसे बदलले आहे, हे दाखवण्यासाठी व्हर्च्युअल रिअॅलिटी अनुभव केंद्रासह एक प्रदर्शनही उभारण्यात आले आहे.  अनुभव केंद्रामध्ये 40 हून अधिक डिजिटल परिवर्तनात्मक उपक्रमांमध्ये अभ्यागत सहभागी होऊ शकतात.

भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठका डिजिटल परिवर्तन  आणि जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नवोन्मेषला  चालना देण्यासाठी आणि डिजिटल कुशल मनुष्यबळाद्वारे सुरक्षित सायबर वातावरणात सार्वजनिक सेवा प्रदान करण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतील.

डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाचे आणखी तीन प्रत्यक्ष कार्यक्रम  हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू येथे अनुक्रमे एप्रिल, जून आणि ऑगस्टमध्ये होतील.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1898597) Visitor Counter : 296


Read this release in: English , Urdu , Hindi