रेल्वे मंत्रालय
जानेवारी 2023 पर्यंत रेल्वेने सुमारे 2,359 किसान रेल्वे गाड्यांमार्फत दिली सेवा
Posted On:
08 FEB 2023 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023
किसान रेल्वे सेवा देण्यासाठी संभाव्य परिमार्ग ठरवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि कृषी/पशुसंवर्धन/राज्य सरकारांचे मत्स्यव्यवसाय विभाग तसेच स्थानिक संस्था आणि एजन्सी, मंडई यांच्याशी सल्लामसलत केली जाते आणि किसान रेल्वे सेवा चालवण्यास प्राधान्य दिले जाते. तसेच मागणीच्या आधारावर, मालवाहतुकीसाठी वाघिणी उपलब्ध करून दिल्या जातात.
किसान रेल सेवा 7 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झाली. त्यावेळेपासून 31 जानेवारी 2023 पर्यंत, रेल्वेने सुमारे 2,359 किसान रेल गाड्या चालवल्या आहेत. या सेवेमार्फत अंदाजे 7.9 लाख टन नाशवंत मालाची वाहतूक करण्यात आली आहे. सेवांच्या संख्येचे राज्यनिहाय विभाजन खालीलप्रमाणे आहे. यामध्ये महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांना 1,838 किसान रेल सेवेचा फायदा मिळाला आहे. इतर राज्यांची माहिती खाली देण्यात आली आहे.
(provisional figures)
States
|
No. of outward services
|
Andhra Pradesh
|
116
|
Assam
|
1
|
Bihar
|
0
|
Delhi
|
0
|
Jammu & Kashmir
|
0
|
Gujarat
|
62
|
Karnataka
|
46
|
Maharashtra
|
1,838
|
Madhya Pradesh
|
74
|
Nagaland
|
0
|
Punjab
|
15
|
Rajasthan
|
5
|
Telangana
|
66
|
Tripura
|
1
|
Uttar Pradesh
|
76
|
West Bengal
|
59
|
रेल्वेमार्फत फळे आणि भाजीपाला असा नाशवंत कृषी माल पाठविण्यासाठी 31.3.2022 पर्यंत, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने मालवाहतुकीमध्ये 50% अनुदान दिले होते. हे अनुदान यापुढे चालू ठेवले गेले नाही. त्यानंतर, रेल्वेने 45% दराने अनुदान देणे सुरू ठेवले आहे. हे अनुदान सध्या 31.03.2023 पर्यंत लागू असणार आहे.
2020-21 दरम्यान, रेल्वेने अनुदान म्हणून 27.79 कोटी रुपये वितरित केले, ज्याची परतफेड अन्न प्रकिया उद्योग मंत्रालयाच्याकडून करण्यात आली. त्यानंतरच्या वर्षात म्हणजे 2021-22 मध्ये, रेल्वेने अनुदान म्हणून 121.86 कोटी रुपये वितरित केले, त्यापैकी केवळ 50 कोटी रूपयांची अन्न प्रकिया उद्योग मंत्रालयाकडून परतफेड करण्यात आली. चालू वर्षात 31.01.2023 पर्यंत, रेल्वेने अनुदान म्हणून 4 कोटी रूपये वितरित केले आहेत.
किसान रेल योजनेअंतर्गत तापमान नियंत्रित स्टोरेज सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकरी/व्यापाऱ्यांकडून आतापर्यंत कोणतीही विनंती प्राप्त झालेली नाही.
रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897427)
Visitor Counter : 186