कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या उप क्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना सीबीआयने केली अटक
Posted On:
07 FEB 2023 5:50PM by PIB Mumbai
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील घोन्सा ओपन कास्ट माइन (ओसीएम), वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल), वणी उत्तर क्षेत्र, वणी येथील उपक्षेत्र व्यवस्थापकाला तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे.
सीबीआयला मिळालेल्या तक्रारीनुसार, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणीतून कोळसा उचलण्यासाठी डिलिव्हरी ऑर्डर जारी करण्यासाठी या उपक्षेत्र व्यवस्थापकाने तक्रारदाराकडून 3,23,610/- रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय तक्रारदाराच्या कंपनीला घोन्सा (ओसीएम), डब्ल्यूसीएल, वणी उत्तर क्षेत्र, येथून 8,200 मेट्रिक टन कोळसा उचलण्याची परवानगी होती परंतु कंपनी केवळ 4,623 मेट्रिक टन कोळसा उचलू शकली. त्यानंतर संबंधित उपक्षेत्र व्यवस्थापकाने नवीन डिलिव्हरी ऑर्डर जारी करायला नकार दिला आणि त्यांनी तक्रारकर्त्याला पूर्वी दिलेल्या परवानगीसाठी आणि 2,500 मेट्रिक टन कोळशासाठी नवीन वितरण ऑर्डर जारी करण्यासाठी वाटाघाटी अंती 3,19,000/- रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सीबीआयने सापळा रचून आरोपीला तक्रारदाराकडून पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच मागताना आणि स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपीच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली असून मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि गुन्ह्याशी संबंधित इतर दस्तऐवज जप्त केले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला यवतमाळ इथल्या सीबीआयची प्रकरणे हाताळणाऱ्या, केळापूरच्या, विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्याला 08.02.2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
***
N.Chitale/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1897099)
Visitor Counter : 147